मुंबईतील भोंदूबाबा रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा

मुंबई भोंदूबाबा रिदम पांचाळ मालाडच्या भोंदूबाबा रिदम पांचाळ (Malad Bhondubaba Ridam Panchal) याला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आठवड्यानंतर रिदम पांचाळवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी भोंदूबाबा रिदम पांचाळला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून अटक केली आहे. (Bhondubaba Malad Mumbai)

भोंदूबाबा रिदम पांचाळ दर गुरूवारी आणि रविवारी तो भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा करतो. जादूटोणा, अघोरी पूजा यामुळे त्याच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक लोक हैराण झाले. त्यामुळे या भोंदूबाबाला अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केलीय. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार  केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओसुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत. (Bhondubaba In Mumbai)

भोंदूबाबाने आरोप फेटाळले- (Bhondubaba Malad Mumbai)

भोंदूबाबाचा सदर सगळा प्रकार, ह्या अघोरी विद्याचे व्हिडिओ या स्थानिकांनी दोन आठवड्यापूर्वीच पोलिसांना दिले आणि स्थानिकांनी सह्या करत यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली. कारण त्याच्या या आघोरी पूजेमुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वारंवार सांगून सुद्धा तो आपला हा कार्यक्रम थांबवत नसल्याने स्थानिकांना पोलिसांमध्ये धाव घ्यावी लागली. ही एक प्रकारे देवीची पूजा असल्याचं हा भोंदूबाबा त्याला या सगळ्या आरोपावर प्रश्न विचारल्यावर सांगतो. मात्र, या पूजेसाठी हा भोंदूबाबा जो साहित्य आपल्याकडे येणाऱ्या लोकांना सांगतो ते साहित्य बघून ही नेमकी कुठली पूजा असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो.

सुशिक्षित लोक बळी – (भोंदूबाबा मुंबईत)

मुंबई जी कधीही झोपत नाही म्हणतात. जी कधीही शांत नसते. जिथे नेहमी वर्दळ असते. अशा दाट वस्ती असलेल्या मुंबईमध्ये अशाप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी गोष्ट घडते. ही फक्त आताच घडतीये असं नाही तर मागील अनेक दिवसांपासून घडते. त्याला अनेक सुशिक्षित लोक बळी पडताय आणि याला खत पाणी देतात हे एक प्रकारे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा वृत्तीला त्या ठिकाणीच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासारख्यांनी डोळे उघडे ठेवून हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पहावं लागेल.

संबंधित बातमी:

Bhondubaba In Mumbai: बकऱ्याचा कलेजा, स्मशान राख, लिंबू-टाचणी…; मुंबईतील भोंदूबाबा, महापालिकेच्या गार्डनमध्ये नको नको ते करायचा!

आणखी वाचा

Comments are closed.