Pune News: पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, कामाच्या टक्केवारीवरून राडा
पुणे बातम्या : पुण्यातील वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या (BJP) आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन गटातील वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून दोघांमध्ये काउंटर चार्जेस केले जात असून पक्षातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. बाणेरमधील माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात हा वाद रंगला आहे. (महाराष्ट्राचे राजकारण)
Pune Politics: कामाच्या टक्केवारीवरून दोघांमध्ये काउंटर चार्जेस
महापालिकेतर्फे बाणेर येथे मागासवर्गीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारले जात आहे. 2017 मध्ये काळे या नगरसेविका असताना त्यांनी या केंद्रासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या कामाची सुरुवात होऊन अनेक वर्ष झाले पण काम पूर्ण झालं नाही. रखडलेल्या कामासाठी तीन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी काळे या भवन रचना विभागात आल्या होत्या. त्यावेळी रोहिणी चिमटे आणि ठेकेदारात चर्चा सुरू असल्याचं त्यांनी बघितलं. या चर्चा एकूण दोघींमध्ये टक्केवारीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या दोन्ही नगरसेविका यांच्यात झालेल्या वादावादीची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.
Buldhana Shivsena : बुलढाणा शहरात शिंदेच्या शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
दरम्यान, असाच काहीसा राजकीय वाद बुलढाणा शहरात देखील रंगला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या समोरच हा गोंधळ झाला आहे. परिणामी देऊळगाव राजा येथे शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. आढावा बैठकीत राडा झाल्याने शिंदेसेनेत अलबेल नसल्याचे चित्र आहे. एका गटाला बैठकीला न बोलावल्याने गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
Buldhana News : सुरूवातीला बाचाबाचीवरून प्रकरण धक्काबुक्कीवर गेलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आलीय. सुरूवातीला बाचाबाचीवरून प्रकरण धक्काबुक्कीवर गेलंय. यामुळे शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे उघड झाले असून मतभेद असल्याचे समोर आलेय. देऊळगाव राजा येथे काल एका हॉटेलमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. ही बैठक नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांचे उपस्थितीत आयोजीत केली होती, या बैठकीला माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकरसह पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
दरम्यानकाही माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रण नसल्याने बैठक सुरू असताना त्यांनी सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी केली. तसेच नवनियुक्त संपर्क प्रमुख सोनार यांचा सत्कार करण्यास आजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे एका गटात असंतोष पसरल्याने आजी-माजी पदाधिकारी आमोरासमोर भिडले आणि शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे चव्हाट्यावर आलेहे. महत्वाचे म्हणजे सेनेचा एका गटाने माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळालहे.
आणखी वाचा
Comments are closed.