पुसदमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर पोलिसांची कारवाई; चौघे जण ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुसद शहरातील विहार लॉजमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या गोरखधंद्यावर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत बनावट नोटा तयार करणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून सुमारे 2 लाख 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुसद शहरात एकच खळबळ उडाली आहे.

विहार लॉजमधील एका खोलीत बनावट चलनी नोटा छापण्याचा उद्योग सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सदानंद वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल इंद्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून छापा टाकला. यावेळी आरोपी 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करताना रंगेहाथ आढळून आले.

छाप्यात टींक्चर आयोडीन, सोडियम थायोसल्फेट, स्पिरिट, प्रिंटर, कागद तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे विविध रासायनिक साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून तयार बनावट नोटा, छपाई साहित्य आणि अन्य उपकरणांसह मोठा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुरेश किशन पेंद्राम (40), अविनाशकुमार सुरेंदर मालराज (37), व्यंकटेश किशन जंगली (33) आणि सैय्यद साजिद सैय्यद खाजा (35) यांचा समावेश आहे.

Comments are closed.