Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
मुंबई : लोकांनी प्रश्न विचारू नये यासाठी त्यांना सातत्याने करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे, त्यासाठी चित्रपट, आयपीएल आणि इतर अनेक माध्यमांचा वापर केला जात आहे. लोकांनी यामध्ये गुंतून जावं आणि सत्तेला प्रश्न विचारू नये यासाठी ही सोय केली जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. लोकांनी आधी इन्स्टाग्रामधून बाहेर पडावं, रोज महाराष्ट्राचं अस्तित्व मिटवलं जात आहे असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. आपण या ठिकाणी आहोत ते महाराष्ट्रासाठी आहोत. आपल्याला ही सत्ता भविष्यात हाती घ्यायची आहे आणि ती आपण घेणार म्हणजे घेणार, असा विश्वास यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
Raj Thackeray On Iran War : इराणला साथ द्यायला हवी होती
जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होताना आपण त्यांना साथ द्यायला हवी होती. आपल्याला इराण तेल रुपयामध्ये देतो. पण खामेनी गेल्यानंतरही आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एकही निषेधाचं वक्तव्य केलं नाही. इराणने जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर आपल्याला पाठिंबा दिला होता, पण आपण तो देश अडचणीत असतानाही त्यांना साथ दिली नाही. याचा भविष्यात आपल्याला त्रास नक्कीच होणार. या देशात काय चाललंय, लोक कुठे निघालेत… कुणाला काही पत्ता नाही.
Comments are closed.