Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
२७ वर्षापूर्वी पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली. आज वेगळ्या भावना आणि वातावरण निर्माण झालं आहे. आज दादा आपल्यासोबत नाहीत त्यांच्याशिवाय हा पहिला वर्धापनदिन आपण करत आहोत. अजित पवारांना जो विकसित महाराष्ट्र अपेक्षित होता त्यानुसार आपण काम करत राहू. शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा पुढे घेऊन जान म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणं
यंदाचं वर्धापनदिन अजित पवारांना समर्पित केला आहे. राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने त्यांनी संघर्ष केला आहे. त्यांचा संघर्ष आपण सर्वांनी पाहिला आहे. शेतकरी कामगार युवक वंचित घटक यांच्यासाठी अजित पवारांनी अहोरात्र प्रयत्न केले. पक्षाला अधिक बळकटी देऊन पक्ष पुढे नेण्यासाठी प्रयत्न ते करत होते
३ वर्षापूर्वी अजित पवारांनी पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतली. कमी कालावधी मिळाला असला तरी राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ओळख निर्माण केली. त्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प हे राज्याच्या विकासाचे दस्तऐवज आहेत
युती सरकारच्या माध्यमातून आपण विकासाचे मुद्दे घेत आहोत. एकल महिलांसाठी काम करत आहोत बळीराजा कर्जमाफी निर्णय घेतला आहे.
शहरी भागातील लोकसंख्या वाढणार आहे त्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबवायचा आहे.
आपल्याला संघटना अधिक मजबूत करायची आहे कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वेगळ्या परिस्थितीत मी जबाबदारी घेतली आहे. येणाऱ्या सगळ्या गोष्टीची मला जाणीव होती. पदाधिकारी कार्यकर्ता आणि त्यांची निष्ठा माझ्या लक्षात आहे. योग्यवेळी संधी दिली जाईल
आता पर्यंत जे घडलं ते मी समजून घेतल. मी पक्षाचा हिताला प्राधान्य देईल. कुणाचा हस्तक्षेप असेल तर मी लक्ष देईल. दादा ज्याप्रमाणे कडक निर्णय घ्यायचे ते माझा स्वभाव नसला तरी मी तो निर्णय घेईल
लवकरच महामंडळ सदस्य नियुक्त्या केल्या जाणार आहेत. पक्ष निष्ठा आणि समर्पण हे मुद्दे विचारात घेतले जातील
Comments are closed.