‘फक्त मुंब्रा नाही, संपूर्ण हिंदुस्थान हिरवं करा.., लोकप्रिय मराठी अभिनेत्याची MIM नगरसेविकेला

ठाणे : राज्यातील 29 महानगरपालिकांचा 16 जानेवारीला निकाल लागला. ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर “कैसे हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” म्हणत ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पक्षाच्या नगरसेविकासह सहर शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया येत असून अनेक कलाकारही उत्तर देताना दिसतायत. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही नुकतीच प्रतिक्रिया देत नगरसेविकेवर संताप व्यक्त केल्यानंतर आता आणखी एक मराठी लोकप्रिय अभिनेत्याने MIMच्या नगरसेविकेवर त्याच्या शैलीत टोला लगावलाय. अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडिया पोस्ट करत नगरसेविकेच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलंय .

अभिनेता अभिजीत केळकरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर राजकीय घडामोडींवरही तो भाष्य करताना दिसतो. अशातच त्याने एमआयएमच्या नगरसेविकास सहर शेख यांना टोला लगावलाय. याबाबत त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तो बागकाम करताना दिसतोय. कुंडीत रोप लावता लावता तो म्हणतोय ‘ .हरा कर दिया ना ..अरे मी तर म्हणतो फक्त मुंब्रा नाही संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा. काय ताई ..? नाही कळलं ? अहो आमच्यात पण हिरवं करतात .पण ते तसं नाही ,असं .. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.

त्याने ही पोस्ट करत फक्त मुंब्रा नको अख्खा हिंदुस्तान, पृथ्वी हिरवीगार करून टाका .झाडे लावा झाडे जगवा .असं म्हटलंय. अभिनेता अभिजीत केळकरच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिलाय. काहींनी म्हटले छान उत्तर दिलय .जय महाराष्ट्र जय शिवराय. काहींनी मस्त चपराक दिली असं कळवलंय .तर काहींनी सहमत असं लिहीत अभिजीतला पाठिंबा दिलाय.

आणखी वाचा

Comments are closed.