पुणे पॉर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉ. तावरेचा अजून एक कारनामा उघड

पोर्श कार अपघात पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. अशातच आता या प्रकरणाबाबत आणखीन एक मोठा खुलासा समोर आला आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Porsche Car Accident) रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरे याचा अजून एक कारनामा समोर आला आहे. यात रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. तावरे (Dr Ajay Taware)  याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डॉ.तावरे यांना आता सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती ही समोर आली आहे. दरम्यान, 2022 मध्ये हे किडनी रैकेट समोर आलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता तावरे याला देखील सहआरोपी करण्यात येणार आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मागील वर्षभरापासून तावरे हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला अजून जमीन मिळाला नाही.मात्र आता गुन्हे शाखा किडनी रॅकेटमध्ये त्याचा ताबा घेणार आहेत. त्यामुळे रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरे याच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली होती. अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या.

हे ही वाचा

Vaishnavi Hagawane Pune Crime: गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवलं! हुंड्यासाठी वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबियांचा तमाशा समोर, हुंड्याच्या पैशांवर बैलाचा बर्थडे

अधिक पाहा..

Comments are closed.