राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला प्रफुल पटेलांची दांडी अन् नेत्यांमधील वाद, हसन
NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत काल (26 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Meetings) बैठक पार पडली आहे. बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं, यावरती माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटलं की, पेल्यामधील वादळ पेल्यामध्येच संपलं आहे. प्रफुल भाई काही कामानिमित्त गैरहजर होते, असंही मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटलं आहे.
तटकरे यांनी बैठकीत कुठल्याही भावना व्यक्त केलेल्या नाहीत, फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं आहे अशा भावना व्यक्त केलेली आहेत. पक्ष एकसंघ असल्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला कुटुंबीयांनी पुढाकार घेतला, मात्र या कालावधीतच या दोघांना टार्गेट करण्यात आल्याची भावना व्यक्त केलेली आहे. तर राष्ट्रवादी अंतर्गत वादावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद हे पेल्यातलं वादळ आहे आणि ते पेल्यामध्येच संपलेला आहे प्रफुल पटेल हे आपल्या कामानिमित्त गैरहजर होते.
हसन मुश्रीफ: राष्ट्रवादी कार्यकारणीवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले…
यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये होतो. काल सुद्धा या संदर्भात बैठक झालेली आहे. या बैठकीत सर्व आमदार सर्व खासदार आणि पक्षाच्या नेते मंडळी उपस्थित होते या सर्वांनी सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे
हसन मुश्रीफ: अर्थ खातं अद्यापही राष्ट्रवादीला मिळालं नाही त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले…
अर्थ खातं हे राष्ट्रवादीचं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या त्यावेळी बजेट येणार होतं, त्यावेळी हे खातं नंतर देतो असं सांगण्यात आलं होतं. ते मिळालं नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आज वहिनी दिल्लीत गेलेल्या आहेत, याचा निश्चितपणे निर्णय होईल आणि भारतीय जनता पार्टी हा सन्मान राखेल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
स्वबाळावर निवडणूक लढवण्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, सर्वच पक्ष तयारी करत असतात. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्यावेळी आपापली तयारी पक्ष करत असतात. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्रच लढतील, असंही पुढे ते म्हणालेत.
हसन मुश्रीफ: गोकुळ निवडणुकीबाबत हसन मुश्रीफ म्हणाले…
गोकुळची कच्ची यादी आणि पक्की यादी असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता कच्च्या आणि पक्क्या याद्यांचा संस्थांकडून ठराव जाणे आणि संस्थांनी त्यांच्या व्यक्तीचा ठराव करून पाठवणे हा पहिला टप्पा, आता दुसरा टप्पा आहे. तो कच्ची आणि पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर सेपरेट ठराव करून पाठवणे, त्यानंतर या दोन्ही अद्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि ही निवडणूक सप्टेंबर महिन्यात लागण्याचा अंदाज आहे.
आम्ही महायुती म्हणूनच लढणार हे सातत्याने यापूर्वी सुद्धा जाहीर केलेलं आहे. आमचे मित्र सतेज पाटील म्हणाले 12000 वेळा मुश्रीफ यांनी महायुती, महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेले आहेत, आता पहिला टप्प्यात आपली मतदार यादी आपले लोक हे चांगल्या पद्धतीने कसे ठराव करतील हे पाहणे गरजेचे आहे. निवडणुकीचा टप्पा अद्यापही पुढे आहे. सतेज पाटील यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही युती म्हणून काय करावं हा आमचा प्रश्न आहे, आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणार आणि जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणे हे फायनल आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे की, निवडणूक वेळेवर घ्या. त्यामुळे निवडणूक वेळेवर होत आहे, असंही मुश्रीफ म्हणालेत.
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सला हलाल सर्टिफिकेट मुश्रीफ म्हणाले….
तर गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सला हलाल सर्टिफिकेट मिळालं आहे. नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना सर्टिफिकेट घेतले. हलाल सर्टिफिकेटची गोकुळला गरज काय असा सवाल व्यक्त होत आहे. तूप,लोणी,दूध पावडर यांना हलाल सर्टिफिकेट घेतले, यावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, मी काल माहिती घेतली, अशा पध्दतीने आपल्या गोकुळमधून अनेक दिवसांपासून अझरबैजान आणि आखाती देशांमध्ये तूप, लोणी पाठवतो, अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्कता असते आणि ते २०२२ सालीच काढलेलं आहे. काय जोडलं, कशाने जोडलं याचं मला आश्चर्य वाटतं आहे, त्यांची सर्टिफिकेटची अट होती म्हणून काढलं, कोणाला काही काम नाही, निवडणूक लागली आहे, त्यामुळे काहींना अशा गोष्टी लागत आहेत, असंही पुढे मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
NCP Meeting : राष्ट्रवादीच्या काल रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत काल (26 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Meetings) पार पडलेली बैठक चांगलीच वादळी ठरल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेलांवर होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनील तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना अधिक हवा मिळाली. दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या गैरहजेरीनंतर नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच, छगन भुजबळांनी मात्र सुनील तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.
NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रफुल पटेलांची बैठकीला दांडी
सुनील तटकरेंच्या बोलण्याआधिच पार्थ पवारांची बैठकीतुन EXIT
सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यात वाद
10 जून पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतरं – मेळावा मुंबईत होणार का पुण्यात?
सुनेत्रा पवारांची खंत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अद्याप अर्थ खाते पुन्हा देण्यात आले नाही.
आणखी वाचा
Comments are closed.