‘मारकुट्या’ सूरज चव्हाणांच्या पुनर्वसनावर प्रफुल पटेलांनी पक्षाची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले

मुंबई : पावसाळी अधिवेशनावेळी विधीमंडळाच्या सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना जबर मारणाऱ्या सूरज चव्हाण यांचे घटनेनंतर महिन्याच्या आतच राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. यानंतर पक्षावरती आणि नेत्यांवरती मोठ्या प्रमाणावरती टीका झाली. यानंतर पहिल्यांदाच पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

हा निर्णय सुनील तटकरे आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बसून घेतलेला

सुरज चव्हाण आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी असल्यानचं फेरनियुक्ती केल्याचं प्रफुल पटेलांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे युवकचे माजी अध्यक्ष सुरज चव्हाण त्यांना आम्ही पक्षाच्या राज्य पातळीची जबाबदारी दिली आहे. हा निर्णय सुनील तटकरे आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बसून घेतलेला आहे. शेवटी एक काम करणारा माणूस त्यांच्या हातून जर काही चूक झाली असेल तर त्यांना आम्ही त्या पदावरून हटवलं. शेवटी तो आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी आहे. त्यामुळे त्याला काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे म्हणून त्याची आम्ही नियुक्ती केली आहे. पक्षांमध्ये त्याबद्दल कुठलीही मतभिन्नता नसल्याचं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची छावा संघटनेच्या नेत्यांना मारहाण केल्यानंतर हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता परत एकदा त्यांना फेरनियुक्ती देताना प्रदेश सरचिटणीसपद दिलं, यावर प्रफुल पटेल भंडाऱ्यात बोलत होते.

प्रफुल्ल पटेलांनी उडविली रोहित पवारांची खिल्ली

टोमण्यांचे उत्तर द्यायला लावू नका, आमचेही काही स्टँडर्ड आहेत, असं म्हणत रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली आहे, मंडल यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आलेल्या रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत वक्तव्य केलं होतं. जर, अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि पुरोगामी विचार स्वीकारून शरद पवारांच्या नेतृत्वात यायला तयार असेल, तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येईल, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना प्रफुल पटेल यांनी, कोणाच्या वक्तव्यावर मला उत्तर द्यायला लावता. मला छोटा नका करा… असं वक्तव्य करून प्रफुल पटेल यांनी रोहित पवारांची खिल्ली उडविली. यासोबतच अनिल तटकरे हे महाराष्ट्रातले आणि कोकणातले जेष्ठ नेते आहेत. त्यांना इतक्या वर्षाचा अनुभव आहे. 40 – 40 वर्ष ज्या लोकांनी राजकारणात घालवले. त्यांना या नवीन लोकांच्या काही टोमण्यांचे उत्तर द्यायला लावता. आमचे पण काही स्टँडर्ड आहे, असा टोला प्रफुल पटेल यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.