बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; प्रफुल्ल पटेल पक्षश्रेष्ठींच


बिहार निवडणूक निकाल 2025 वर प्रफुल्ल पटेल: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Result 2025) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झालं. अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर बोलताना, बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका, असं सांगितल्याचं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोललेत. तर बिहारच्या स्थानिक लोकांनी ठरवलं, पक्षाचा कुठंही आग्रह नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले. आम्ही कुठंही प्रचाराला गेलो नाही. आमचा कुठेही आग्रह नव्हता की, आमचा उमेदवार उभा करा….पण, स्थानिक स्तरावर काहीना काही पक्षाचे जे संघटन असतात त्यात लोकांची इच्छा राहतेचं, लोकल लेव्हलवर त्यांनीच निर्णय घेतला. पण, आमच्या पक्षश्रेष्ठीकडून काही विशेष तिथे काही लक्ष घातलं नाही, अशी सावरासावरही प्रफुल्ल पटेल यांनी केली.

पश्चिम बंगालमध्येही भाजपचं सरकार बनणार- प्रफुल्ल पटेल (Praful Patel On West Bengal)

बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील टार्गेट पश्चिम बंगालला केलं आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधून गेलेली गंगा पश्चिम बंगालमध्ये मिळते असं मनात ममता बॅनर्जी यांना एक प्रकारे इशारा दिलाय. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची नीती आणि त्यांची दिलेली योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे. तसा एक परिणाम आणि त्याचीही पावती आहे. पश्चिम बंगालमध्ये ही फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पार्टीचं तिथे नक्कीच चांगलं प्रदर्शन राहील, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही नक्कीच वाढ होईल किंबहुना सरकारही बवू शकेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा ते गंगासागर असा दिलेला नारा योग्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक महायुती स्वबळावर लढणार- प्रफुल्ल पटेल (प्रफुल्ल पटेल महायुतीवर)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. काही काही ठिकाणीच जमल्यास महायुतीमध्ये अलायन्स होऊ शकते. पण, महायूतीच्या तिन्ही पक्षाने आम्ही निर्णय केलेला आहे, सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आणि स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप मोठी गर्दी असते. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. त्यासोबतच स्थानिक स्तरावर काही वेगवेगळी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तिथला निर्णय तिथेच घ्यावं लागते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहे. एखाद ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं तडजोड करू, असं माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Ajit Pawar NCP Bihar Election Results 2025: अजित पवारांची महत्त्वाकांक्षा धुळीला मिळाली, बिहार निवडणुकीत राष्ट्रवादीचं वाट्टोळं झालं, 13 उमदेवारांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर

आणखी वाचा

Comments are closed.