शरद पवारांसोबत युती केल्यास काहीच हरकत नाही; अमित शाह प्रफुल पटेल अन् सुनील तटकरेंना काय म्हणाल

धूळ पटेल सुनील तटकरे अमित शहा यांची भेट : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचं (Municipal Corporations Election 2026) बिगुल वाजलंय. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह (Amit Shah) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यात जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीतील माहिती आता समोर आली आहे.

राज्यात जिथे युती करणे शक्य असेल तिथे युती करा, अशी अमित शाह यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना सूचना दिल्या आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गेल्यास अमित शाह यांना काहीच हरकत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वासोबत बोलण्याचं देखील आश्वासन देखील अमित शाह यांनी यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंना दिलं. अमित शाहांच्या या भेटीनंतर उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Praful Patel Sunil Tatkare Amit Shah Meet)

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादीविरुद्ध लढणार- देवेंद्र फडणवीस

आगामी राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal Corporation Election 2026) राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल जाहीर केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Municipal Corporation Election 2026)

प्रफुल पटेल-सुनील तटकरे दिल्लीत; अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Pimpri Chinchwad Election: महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र

आणखी वाचा

Comments are closed.