प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द

प्रल्हाद जोशी: गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. NEET पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान, यानंतर नवीन शिक्षणमंत्री कोण होणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, अखेर नवीन शिक्षणमंत्री कोण होमार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, मोदी सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कॅबिनेट मंत्री  प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी (25 जुलै, 2026) नीट वादावरील आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

कोण आहेत प्रल्हाद जोशी ?

प्रल्हाद जोशी हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते सध्या एनडीए सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धारवाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विनोद आसुती यांचा 97,324 मतांनी पराभव करून सलग पाचव्यांदा विजय मिळवला.

शिक्षण आणि व्यवसाय

जोशी यांनी हुबळी येथील के.एस. आर्ट्स कॉलेज आणि कर्नाटकातील धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली आहे.

आरएसएस आणि आंदोलन: 1992 ते 1994 दरम्यान हुबळी येथील इदगाह मैदान आंदोलनातून ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.

प्रदेशाध्यक्ष पद: 2014 ते 2016 या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

संसदीय कार्य: 2014 ते 2018 पर्यंत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांच्या पॅनेलवर सदस्य म्हणून काम केले.

2019  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले आणि त्यांच्याकडे संसदीय कार्य, कोळसा व खाण मंत्रालय देण्यात आले

2024 च्या निवडणुकीत सलग पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर, त्यांनी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून शपथ घेतली.

प्रतिज्ञापत्रानुसार ते व्यवसायाने उद्योगपती आहे.

प्रल्हाद जोशी हे सध्या केंद्र सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री

दरम्यान, प्रल्हाद जोशी हे सध्या केंद्र सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने आता ते दोन्ही मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. सरकारकडून शिक्षण क्षेत्रातील कामकाज सुरळीत सुरू राहावे आणि महत्त्वाचे निर्णय रखडू नयेत, यासाठी हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरात सुरू असलेल्या परीक्षा गैरव्यवहार आणि NEET-UG वादाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याला प्राधान्य देण्यासाठी आणि परिस्थितीचा गैरफायदा कोणालाही घेऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांतील घटनांबद्दल दुःख व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा आपण आदर करत असल्याचेही नमूद केले.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

Comments are closed.