मोठी बातमी : सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत नाव घेतल्यानंतर प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय

Prajakta Mali On Suresh Dhas, मुंबई : भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार आहे. बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. प्राजक्ता माळीचं नाव घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती. त्यानंतर आता प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. महिला आयोगाकडे तक्रार या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी. ज्याने आरोप केले, त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. उद्या प्राजक्ता माळी यांच्याकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

सुरेश धस काय काय म्हणाले होते?

सुरेश धस आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होत की, आम्ही बघत असतो rashmika  mandana,… प्राजक्ता माळी.,. सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे..धनुभाऊ आपले विमान खाली आणा.. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे.. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा.. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही.. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत.. मुस्लिम लोक सहभगी होणार आहेत.

भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं.

सुरेश धस यांची मुंडेंसह मिटकरींवर जोरदार टीका

पुढे बोलताना धस म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री यांना टरबूज ही उपाधी यांच्या सोशल मीडियाने दिली.. पण काय झालं.. आता मला ट्रोल करत आहेत.. फेक अकाउंट वरून बोलले जात आहेत.. दम असेल तर समोर येऊन बोला..वाल्मिक कराड यांच्याशी माझे कसे संबंध आहेत ते सांगा की मधुर आहेत.. अमधुर आहेत.. तुम्हीसुद्धा माझे मित्र होते.. माझ्याकडे कागद आहेत.. ती तारीख सांगतो.. कधीपासून ते माझे मित्र राहिले नाही..अमोल मिटकरी लहान आहे.. तू कोणाच्या नादी लागतोय.. या रगेलच्या नादी लागू नको.. तुझे लय अवघड होईल..

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : लघुशंका करत असताना हटकल्याने वॉचमनसह त्याच्या पत्नीला मारहाण करत गोळीबार, पुणे जिल्ह्यातील एका हॉटेलजवळ धक्कादायक प्रकार

अधिक पाहा..

Comments are closed.