रेकॉर्डवर असलेला अमित शाहांचा ‘तो’ व्हिडीओ आम्हाला दिला जात नाही, प्रणिती शिंदेंचा आरोप

प्रणिती शिंदे, सोलापूर : ” संविधानवर चर्चा आम्हाला आणखी हवी होती पण भाजपने होऊ दिली नाही. वैयक्तिक टीका आणि आरोप करण्यात यांनी वेळ घालवला. यांना संविधान मान्य नाही ते केवळ मनुस्मृती मानतात. अमित शाह जे बोलले ते रेकॉर्डवर आहे, आम्ही रेकॉर्डमधून तो व्हिडीओ मागतोय ते देत नाहीयेत”, असा आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलाय. त्या सोलापुरात (Solapur) बोलत होत्या.

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, संघाने कायम तिरंगाचा संविधानाचा अपमान केलाय. अचानक त्यांच्या मनात आता संविधान आणि तिरंगा बद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे. संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे पार पाहिजे होतं.  पण या देशाचे जनतेने ते होऊ दिलं नाही. जनतेने हे चालू दिलं नाही म्हणून त्यांच्या मनात अचानक प्रेम निर्माण झालं.  अमित शाह यांचा खरा चेहरा संसदेत समोर आलाय.

उद्या आम्ही सोलापुरात एक मोर्चा काढणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत हा मोर्चा जाईल. संघाच्या लोकांनी म्हटलेलं संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखं आहे. तीन रंग तिरंगायत असल्याने अशुभ असल्याचे म्हणले होते. आता अचानक यांना तिरंगा आणि संविधान बाबतीत प्रेम निर्माण झालेलं आहे, असंही प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी नमूद केलं.

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, परभणीमध्ये जे घडले निषेधार्ह आहे. सूर्यवंशी यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. उद्या राहुल गांधी परभणीला येणार आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतरच अशा गोष्टी घडयाला सुरुवात होतात. Evm ची लढाई देखील अशीच आहे. ती भाजप विरुद्ध काँग्रेस राहिली नाही, लोकांची लढाई झाली आहे. मुख्यमंत्री हे evm चे मुख्यमंत्री आहेत.राहुल गांधी मारकडवाडीला येतील पण तारीख अजून निश्चित नाही.

नाना पाटोले यांनी जे राजीनामा देण्याचं बोलले ते नैतिक जबाबदारी स्वीकारून बोलले. लाडकी बहीण आता सावत्र झाली का? हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आलं. सोलापूरला मंत्रीपद मिळालं नाही, ही शोकांतिका आहे. भाजपचं इथलं नेतृत्व सक्षम काम करत नाही. भाजपच्या काळात अघोषित आणीबाणी आहे. नोटबंदी सारखे निर्णय हे असंविधानिक होते, असंही शिंदे म्हणाल्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics : आईकडे जावं की बापाकडे जावं अशी आमची परिस्थिती, हिरामण खोसकर छगन भुजबळ आणि अजितदादांबद्दल काय म्हणाले?

अधिक पाहा..

Comments are closed.