एकनाथ खडसेंच्या जावयावरील सर्वात मोठा कलंक फॉरेन्सिकने पुसला
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची ड्रग्स पार्टी प्रकरणात फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये होते. प्रांजल खेवलकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे.
Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर यांना जामीनावरती बाहेर
पुण्यातील खराडी परिसरात कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे रक्षा खडसे यांचे पती आणि एकनात खडसे यांचे जावई आहेत. दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते. त्यामुळं त्यांना मिळालेला जामीन मोठा दिलासा होता. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर करण्यात आला होता.
Pranjal Khewalkar: नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. त्या पार्टीमध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील आढळले होते. अंमली पदार्थाचं सेवन प्रांजल खेवलकर यांनी केलं हा कळीचा मुद्दा होता. त्याच मुद्यावर त्यांना जामीन मिळालेला होता. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. प्रांजल खेवलकर सहभागी असलेल्या पुण्यातील पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकून प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील पार्टी झाल्याचा दावा केला होता.
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. यामुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.
आणखी वाचा
Comments are closed.