काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं
Prashant Jagtap Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देणारे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र त्यात आज सकाळी ट्विस्ट पाहायला मिळाला. प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (मराठी) यांनी ऑफर दिली. मात्र मी काँग्रेस पक्षातच प्रवेश करणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितले.
प्रशांत जगातप नेमकं काय म्हणाले? (Prashant Jagtap Pune)
प्रशांत जगताप एबीपी माझाशी बोलतना म्हणाले की, एका विचारधारेसोबत जाण्याचा माझा निर्णय झाला आहे. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की माझे पुर्वाश्रमीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा यांच्यावर माझी श्रद्धा आहे. त्यांनी काय आघाडी करावी हा त्यांचा निर्णय आहे. माझी त्याला हरकत असण्याचा काही प्रश्न नाही. दोन दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध माध्यमांकडून माझ्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत, यापैकी कोणत्याही प्रतिक्रियेत मी माझे श्रद्धास्थान शरद पवार, सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. याच नेत्यांमुळे मी कार्यकर्ता म्हणून घडलो, यांच्याबद्दल माझ्या मनात कालही आदर होता, आजही आहे आणि यापुढेही अनंत काळ आदरच असणार आहे, असं प्रशांत जगताप यांनी सांगितले.
प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंकडून ऑफर- (Prashant Jagtap Uddhav Thackeray मराठी)
प्रशांत जगताप आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल रात्री तब्बल 9 मिनिटं चर्चाही झाली अशी माहिती एबीपी माझाला जगतापांच्या निकटवर्तीयाने दिलीय. शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी जगतापांना दिल्याची माहिती मिळतेय. भाजपसोबत कधीही जाणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या जगातापांना उद्धव ठाकरेंनी ऑफर दिल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना काही वेळापूर्वीच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रशांत जगताप यांनी शिंदेशी बोलणे टाळले असल्याचं समोर आलं आहे. शिवसेना पक्षात येण्याची एकनाथ शिंदे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर होती का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण आहेत प्रशांत जगताप? (कोण आहेत प्रशांत जगताप)
- प्रशांत जगताप यांनी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली.
- पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून, ते वानवडी प्रभागातून निवडून येत आहेत.
- 2016-17 या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 2021 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
- 2023मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवली होती.
- प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर पदी राहिलेले आहेत.
- शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळख आहे.
- शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रशांत जगताप यांची पुण्यात ओळख आहे.
- 2024 विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून लढवली होती.
- सलग तीन वेळा वानवडी परिसरातून नगरसेवक राहिले आहेत.
- 2007,2012 आणि 2017 या तिन्ही महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप निवडून आले.
- महापालिकेत महापौर,पीएमपीएल संचालक,पक्ष वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.