शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होते, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा- सरनाईक
धाराशिव : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका युवकाने नर्तिकेच्या वेडापायी आणि तणावात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गत आठवड्यात घडला होता. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून नर्तिकेच्या पायात आपलं आयुष्य संपवल्याने एक कुटुंब पोरकं झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील पारगावच्या कला केंद्रात नाचणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडने (Pooja gaikwad) गोविंद बर्गे या युवकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर, त्याच्याकडून सातत्याने पैसे,सोनं आणि जमिनीचीही मागणी करत आर्थिक लूट केल्याचं पोलीस तपास समोर आलं आहे. आता, याप्रकरणी धाराशिवचे पालकमंत्री प्रॅटाप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. तसेच, सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर धंदे आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या कला केंद्रांवर कारवाई करा, ते बंद करा, असे निर्देशच त्यांनी दिले आहेत.
कला केंद्राच्या नावाखाली इतर धंदे नको, जेवाय कला केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली वेश्या-व्यवसाय किंवा शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा, असे निर्देशच पालकमंत्री प्रॅटाप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणावर भाष्य केलं.
कला केंद्राच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल तर अशी सगळी कला केंद्र बंद करा. लोककला जिवंत राहिली पाहिजे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, त्याच्या नावाखाली इतर धंदे नको, अशा शब्दात पालकमंत्री प्रॅटाप सरनाईकांकडून धाराशिव जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पारगावच्या तुळजाई कला केंद्राचा प्रस्ताव रद्द करावा हा पोलीस विभागाचा अहवाल आहे. याच पारगाव येथील तुळजाई कला केंद्रात नर्तक पूजा गायकवाड काम करत होती. कला केंद्रातील नर्तकीच्या नादी लागून आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे प्रकरणामुळे कला केंद्रातील गैरप्रकार आणि बेकायदेशीर धंद्यांमुळे कला केद्रांवर टीकेची झोड उठली आहे. तुळजाई कला केंद्राप्रमाणे इतर कला केंद्रातही चुकीचे प्रकार चालत असतील तर प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी आजच्या बैठकीत प्रशासनाला दिल्या आहेत. लोककला जिवंत ठेवत कला केंद्राचा प्रश्न हाताळण्याच्या सूचनाही सरनाईक यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.