पुजा खेडकरला मोठा झटका; पूजा खेडकरचे ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्

पुणे: गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्वत्र चर्चेत आलेल्या पुजा खेडकरचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिला आहे. ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेट आवश्यक असते. पुजा खेडकरचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेट रद्द झाल्याने तिला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्याचा अधिकार नव्हता हे स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारकडून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पुजा खेडकरच्या नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेटची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

पुजा खेडकरने ओबीसी असल्याचा दावा करत ओबीसी कोट्यातून आत्तार्यंत नऊ वेळा युपीएससीची परिक्षा दिली होती. त्यात अपयश आल्यानंतर पुजाने ओबीसी आणि दिव्यांग असल्याचा दावा करत नव्या नावाने परिक्षा देण्यास सुरुवात केली होती. मात्र तिच्या दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत वाद निर्माण झाल्यानंतर तिला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पुजा खेडकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी खेडकर यांचा ओबीसी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज एक महिन्यापूर्वी फेटाळला होता. खेडकर यांनी आता राज्याच्या ओबीसी विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळे यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी पूजा खेडकरने चार आठवड्यांची मुदतही मागितली आहे. पूजा खेडकर या 2023च्या आयएएस बॅचमधील अधिकारी असून तिच्यावर ओबीसी नॉन-क्रीमी लेयर आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरने खोटी जात आणि दिव्यांग प्रमाणपत्रे दिली असून मानसिक आजार, कमी दृष्टी व हालचालींची अडचण असे आजार असल्याचे दाखवून आरक्षण घेतल्याचे आरोप आहेत.

त्याचबरोबर ओबीसी नॉन क्रिमीलेयरचे आरक्षण घेण्यासाठी उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. पूजा खेडकरच्या वडिलांच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता असताना आपल्या कुटुंबाचे वार्षिक 6 लाख रुपयाचे असल्याचे दाखवले होते. मात्र चौकशीत तिच्या कुटुंबाकडे 23 जंगम मालमत्ता आणि 12 गाड्या असल्याचे समोर आले. पूजाचे वडील दिलीप खेडकर हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होते आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. यामुळे देखील पुजा खेडकरच्या अडचणी वाढल्या होत्या. जुलै 2024 मध्ये युपीएससीने (UPSC) पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये पूजाला पदावरून बडतर्फही केले होते.

आणखी वाचा

Comments are closed.