माझ्या बहिणींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
पुणे : एका परप्रांतीय कामगार युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली असून आत्महत्येपूर्वी या युवकाने एक व्हिडिओ देखील बनवला होता. या व्हिडिओतून त्याने आपल्या कुटुंबाबद्दलची काळजी आणि दोन बहिणींवरील प्रेमही व्यक्त केलं आहे. युवकाने मृत्युपूर्वी आपल्या कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) हा पिंपरी-चिंचवडच्या (Pune) काळेवाडी येथील देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता. मात्र, नैराश्यातून व आर्थिक तंगीतून त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याची समजते. याप्रकरणी, पोलीस (police) अधिक तपास करत आहेत.
देहूरोडमध्ये कंस्ट्रक्शन इमारतीवर कामावर असलेला संजयकुमार हा युवक 17 तारखेपासून बेपत्ता होता. त्यामुळे, देहूरोड पोलीस स्टेशनला त्यासंदर्भात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तांत्रिक तंत्रज्ञानच्या आधारे या बेपत्ता तरुणाचा शोध लावला. मात्र, पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह लागला, या मृतदेहा शेजारी एक विषाची बाटली पोलिसांना सापडली आहे. त्यामुळे, या युवकाने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.
संजयकुमारने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडितून तो आपल्या कुटुंबीयांचा उल्लेख करताना ह्रदयस्पर्शी हाक देत असल्याचे दिसून येते. माझ्या आई वडिलांबद्दल मला आदर आहे, तर माझ्या दोन लहान बहिणींची मला खूप काळजी वाटते. माझ्यानंतर त्यांचा सांभाळ नीट करावा, त्यांनी शिकून मोठं व्हावे हीच माझी इच्छा आहे, असे हा युवक व्हिडिओत म्हणत आहेत. आत्महत्यापूर्वी या तरुणाची आपल्या परिवाराबद्दलची तळमळ आणि प्रेम पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही गहिवरुन येतं. दरम्यान, सध्याची तरुणाई आर्थिक विवंचनेतून किंवा नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे, पोलिसांकडून समुपदेश आणि मोटीव्हेशन करण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र, पुढचा-मागचा विचार न करत तरुण टोकाचं पाऊल उचलताना दिसून येतात ही चिंतेची बाब आहे.
हेही वाचा
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
आणखी वाचा
Comments are closed.