संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी निघाल्या पण… सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत द

पिंपरी-चिंचवड : काळेवाडीमध्ये ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संक्रांतीनिमित्त साड्या खरेदी करण्यासाठी जात असताना सख्ख्या बहिणींच्या (Pune Accident News) दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने Pune Accident News) दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणी (Pune Accident News) ठार झाल्या. काळेवाडीतील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे काल (बुधवारी दि. १४ जानेवारी) दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. ऐन सणाच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.(Pune Accident News)

ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४), नेहा पांडुरंग शिंदे (२०, दोघीही रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावं आहेत. जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) या ट्रकचालकाला पोलिसांनी (Pune Accident News) ताब्यात घेतले आहे. काळेवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिंदे आणि नेहा शिंदे संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी दुचाकीवरून Pune Accident News) जात असतानाच रहाटणी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक Pune Accident News) दिली. या अपघातात दोघींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक नागपूर येथून वाटाणा घेऊन पुणे येथे आला होता. ती पोती उतरवून परतत असताना ही घटना घडली.(Pune Accident News)

Pune Accident News: दोन्ही मुली गमावल्याने शिंदे दाम्पत्याचा आधार हरपला

अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही बहिणी घराचा आधार होत्या, ऋतुजा वकील होती. ताथवडेतून तिने कायद्याचे शिक्षण घेतलेलं होतं. नेहा कॉलेजची विद्यार्थिनी होती. त्यांचे वडील पांडुरंग शिंदे यांचा मिरची कांडपचा व्यवसाय आहे. आई कमल गृहिणी आहे. शिंदे दाम्पत्याला दोन मुली होत्या. दोघी आपल्या आई-वडिलांचा आधार होत्या, मात्र, दोघींच्या मृत्यूने शिंदे दाम्पत्याचा आधार गेला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Accident News)

Pune Accident News: साड्या खरेदी करण्यासाठी जाताना काळाने घाला घातला

ऋतुजा शिंदे आणि नेहा शिंदे या दोघीही संक्रांतीनिमित्त खरेदीसाठी पुनावळे येथून घरातून बाहेर पडल्या. पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेत साड्या खरेदी करण्यासाठी जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.ऐन सणाच्या दिवशी झालेल्या या घटनेने पुनावळे परिसरावर शोककळा पसरली होती.( Pune Accident News)

आणखी वाचा

Comments are closed.