पुण्यातील राष्ट्रवादीची युती फिस्कटली, घड्याळ की तुतारी चिन्हावरुन दोन्ही पवारांमध्ये वाद
पुणे : दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात (Pune Election) एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिस्कटल्याची माहिती आहे. घड्याळ की तुतारी, कोणत्या चिन्हावर लढायचं यावरुन ही युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (शरद पवार राष्ट्रवादी) तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू केली आहे. त्यामुळे पुण्याचं राजकारण आता वेगळ्याच वळणावर पोहोचल्याचं दिसतंय.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. वरिष्ठ स्तरावरून त्याला मान्यताही देण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही पार पडली. परंतु चिन्हाच्या अडचणीमुळे मात्र ही युती फिस्कटल्याची माहिती आहे.
पुणे राष्ट्रवादी आघाडी बातम्या : घड्याळ चिन्हासाठी अजित पवार आग्रही
अजित पवारांकडून पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी घड्याळ्याच्या चिन्हाचा आग्रह करण्यात आला. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या उमेदवारांसाठी तुतारी चिन्हावर ठाम असल्याची माहिती आहे. या चिन्हांवरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची तातडीची बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
Pimpri Chinchwad Election News : पिंपरी चिंचवड, ठाण्यात काय होणार?
जर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चिन्हाचा वाद निर्माण झाला असेल तर त्याचा परिणाम हा पुण्यासोबत पिंपरी चिंचवड, ठाणे आणि इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंबंधी वरिष्ठ पातळीवरुन मंजुरी मिळाली होती. त्यानंतर पुण्यातील नेत्यांनी त्यावर चर्चाही केली होती.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये चर्चा झाली. पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी अजित पवारांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसंबंधी अंतिम चर्चाही केल्याचं समोर आलं.
आता पुण्यातील युती ही चिन्हाच्या वादावरुन फिस्कल्याची माहिती समोर आल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि ठाण्यामध्ये काय होणार याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा :
आणखी वाचा
Comments are closed.