हनी ट्रॅपवाल्या प्रफुल्ल लोढाला पिंपरी पोलिसांकडून अटक; 36 वर्षीय महिलेचे गंभीर आरोप, तपास सुरू
पुणे: हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी अटक केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासाठी बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. ती मंजुरी मिळताच आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आलं. काही वेळापूर्वी बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केली, आता थोड्यावेळात त्याला न्यायालयात हजर केलं जाईल.
२७ मे २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील नामांकित हॉटेलमध्ये महिलेला बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. प्रफुल्ल लोढाने पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावतो असे आमिष दाखवून हॉटेलवर बोलवून घेऊन अत्याचार केला आहे. याआधी मुंबईमधील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
अत्याचाराचा गुन्हा
‘हनी ट्रॅप’सह एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काम देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. त्यानंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर लोढा याने पीडित महिलेस पतीला नोकरी लावतो, असे सांगून 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील हॉटेलमध्ये बोलावले. पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात शरीरसंबंध ठेवायला दे, असं सांगितलं. त्याला तिने नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित महिलेने 17 जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
प्रफुलला लोधा परिचय
प्रफुल्ल लोढा हा एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात होता. पण नंतर प्रफुल्ल लोढा यानी त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यानी वंचितमध्ये पक्षप्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसात लोढाकडून माघार घेण्यात आली होती. कथित समाजसेवक आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.