भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणीच्या शोधासाठी सहा पथकं तैनात, मात्र अद्यापही पोलिसांना पत्ता लागेना

भिगवण अपहरण प्रकरण: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण (Kidnapping Case) झालेल्या मुलीला शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आई आणि भावासोबत गाडीवरून घरी जात असताना मुलीला पळवून नेण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. तर कालावधी (18फेब्रुवारी) भिगवण बंदची हाक देण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांकडून जन आक्रोश मोर्चा आयोजन देखील करण्यात आलं. त्यानंतर त्या मुलीने मी स्वतःहून निघून आला असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. (Bhigwan Kidnapping Case)

भिगवण अपहरण प्रकरण : घटना घडून 40 तासांहून अधिकचा काळ लोटला, अद्याप तरुणी सापडेना

तर दुसरीकडेआमदार गोपीचंद पडळकर यांनी तिच्यावर दबाव टाकून हा व्हिडीओ बनवला असल्याचा आरोप केलाय. तर लवकरात लवकर पोलिसांनी मुलीला शोधावंनाहीतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना दिला. आज 17 फेब्रुवारीला चार वाजल्यापासून पोलिसांची सहा पथक मुलीचा शोध घेत आहे. तर जवळपास 40 तास होत आले तरी मुलीचा शोध पोलिसांना लागला नाही. त्यामुळे आता नागरिकांचा राग वाढत चालला असून या मुलीला शोधणं हे पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे.

आतापर्यंत या प्रकरणात काय झालं? (Bhigwan Kidnapping Case)

– १७ फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
– रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
– पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
– रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
– अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
– दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
– व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
– मुलीचे वय 21 वर्ष आहे.
– अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
– अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
– आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे.
– आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
– शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
– पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
– यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
– कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
– जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
– पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.