पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड

पुणे : एकीकडे नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आणि नोकरीचे आमिष (Pune Crime News) दाखवून एका ४२ वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार (Pune Crime News) करण्यात आला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भोंदूला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याचा बनाव रचणाऱ्या या नराधमाने महिलेला तब्बल ५० लाख ५५ हजार रुपयांना लुटले असल्याचेही तपासात समोर आले आहे. (Pune Crime News)

Pune Crime News: पाच वर्षांपासून छळ अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे पती कौटुंबिक वादामुळे वेगळे वेगळे राहत होते. पाच वर्षांपूर्वी या महिलेची भेट भोंदू (Pune Crime News) औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, पंढरपूर) याच्यासोबत झाली. आपण ‘देवऋषी’ असल्याचे भासवून गडदे याने महिलेला जाळ्यात ओढलं. स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून पहिल्यांदा महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव या ठिकाणी नेऊनही त्याने वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याची बाब समोर आली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: अत्याचारासह भोदूबाबने केली ५० लाखांची फसवणूक

केवळ शारीरिक अत्याचारच नव्हे, तर गडदे याने आर्थिक लूटही केली. त्याने पीडित महिलेला बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. मे २०२१ पासून त्याने रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात महिलेकडून एकूण ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक आणि शोषण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अखेर ११ एप्रिल रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेबाबत ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेचं आपल्या पतीसोबत पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ते दोघंही वेगळे राहत होते. महिलेची पाच वर्षांपूर्वी एकामार्फत गडदे याच्याशी ओळख झाली. तेव्हा गडदे याने देवऋषी असून माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लाॅजवर बोलावून अत्याचार केला. एकीकडे खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आलेलं असताना सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील लोक अशा भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.