नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय, चुलत भावाला संपवण्यासाठी पुण्यात चार लाखांची सुपारी
पुणे : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी चार लाकांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली. १७ नोव्हेबरला ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय 22, सध्या रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडित (वय 35, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती.
पुणे हत्या: अनैतिक संबंधातून हत्या
अजयकुमार पंडितचे त्याच्याच नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोक पंडितला मिळाली होती. त्यानंतर त्यानेच गुंडांना सुपारी देऊन अजयची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.
अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी साथादीर कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय 21), सचिनकुमार शंकर पासवान (वय 26) तसेच खुनातील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय 30) यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले. या गुन्ह्यात तो स्वतःही सहभागी असल्याचे समोर आले. पुणे पोलिसांनी या चौघांचा शोध केला असता ते रेल्वेने झारखंडला पसार होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या चौघांनाही अटक केली.
अकोल्यात तरुणाची हत्या
अकोला जिल्ह्यातील शेगाव-अकोट रस्त्यावर प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गौरव बायस्कार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव. प्रेम प्रकरणातून गौरवची 4 जणांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर मारेकरी हे लोहाऱ्यातील मोरे कुटुंबातीलच असल्याचे समोर आले आहे. तसेच इतर दोन जणांचाही या हत्येमध्ये समावेश असल्याचा समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरे कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि इतर 2 जण असे चार जणांनी एकत्रित गौरवची हत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावरील अंदुरा फाट्यावर भर दिवसा हे हत्याकांड घडले आहे. या प्रकरणात उरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती. तर मारेकऱ्यांनी जवळील चाकूने गौरव बायस्कार याच्यावर सपासप चाकूने वार करीत गंभीर स्वरूपात जखमी केलंय. या घटनेत गौरवचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात उरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूये. मात्र, या घटनेने अंदुरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.