पुण्यात संतापजनक घटना, 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कॅफेत बोलावलं अन् नको ते केलं, फोटोही व्हा

पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Pune Crime News) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन विधीसंघर्षित बालकांसह (अल्पवयीन मुले) एका कॅफे मालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षीय मुलगी तिच्या आईसोबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. तिच्या काही मित्रांनी तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची प्राथमिक तक्रार तिने नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.(Pune Crime News)

Pune Crime News:  कॅफेमधील काळेबेरे पोलीस तपासात उघड

पोलिसांनी जेव्हा पीडित मुलीकडे सखोल चौकशी केली, तेव्हा या प्रकरणातील धक्कादायक वास्तव समोर आले. काही दिवसांपूर्वी तिच्याच एका ओळखीच्या मुलाने तिला तळेगावमधील ‘कोजी कॅफे’ (Cozy Cafe) येथे नेले होते. या कॅफेमध्ये त्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, या कॅफेमध्ये अशा प्रकारचे अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. कॅफे मालक अशा प्रकारांना मुभा देत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Pune Crime News:  पोलीस प्रशासनाची तात्काळ कारवाई

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तळेगाव दाभाडे पोलिसांनी तातडीने पावले उचलली. ‘कोजी कॅफे’चा मालक (शिंदे) याला पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. तसेच पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आणि तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune Crime News:  पोलीस प्रशासनाची अधिकृत माहिती

याबाबत माहिती देताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले की, “बारा वर्षांच्या पीडित बालिकेच्या तक्रारीवरून दोन विधीसंघर्षित बालकांसह कॅफे मालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित कॅफेमध्ये असे प्रकार चालत असल्याचे चौकशीत समोर आले असून, त्या अनुषंगाने कॅफे मालक शिंदे याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.”

Pune Crime News:  सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तळेगाव दाभाडे सारख्या गजबजलेल्या भागात आणि तेही एका कॅफेमध्ये असा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अशा कॅफे संस्कृतीवर आणि तेथे चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांनी कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आता सर्वसामान्यांमधून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

हेदेखील वाचा

Comments are closed.