कोरेगाव भीमामध्ये परप्रांतीय युवकाला शस्त्राने वार करून संपवलं; ममता बॅनर्जींनी व्यक्त केला सं
पुणे: शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने (Pune Crime News) हल्ला करून परप्रांतीय युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. सुकेन महातो (वय ३०, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत युवकाचे नाव आहे. आपले घर या हॉटेलच्या पाठीमागे युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात (Pune Crime News) मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथक व अंगुलीमुद्रा पथक पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी तुळशीराम महातो यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या खून प्रकरणी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.(Pune Crime News)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, परप्रांतीयां विरोधातील द्वेषाचे वातावरण निर्माण करून निरपराध लोकांना लक्ष्य बनवले जात असल्याचे नमूद केले. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर व आदर्श शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(Pune Crime News)
ममता बॅनर्जी यांची पोस्ट
पुणे, महाराष्ट्र येथे पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील बंडवान येथील २४ वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेन महतो यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे मन सुन्न झाले आहे. आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य असलेल्या या तरुणाची अशी क्रूर हत्या होणे अत्यंत संतापजनक आणि वेदनादायक आहे. ही घटना साधी गुन्हेगारी नसून द्वेषातून घडवलेला गंभीर गुन्हा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका तरुणाला त्याची भाषा, ओळख आणि मूळ यामुळे लक्ष्य केले गेले, त्याला छळण्यात आले आणि त्याची हत्या करण्यात आली, हे अत्यंत अमानुष आहे. समाजात वाढत चाललेल्या परप्रांतीयांविषयीच्या द्वेषपूर्ण वातावरणाचे हे परिणाम असल्याची टीका करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सुखेन महतो यांच्या कुटुंबीयांना या दु:खद प्रसंगी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
कोरेगाव भीमा परिसरातील पुणे–नगर महामार्गालगत असलेल्या ‘आपलं घर’ हॉटेलच्या मागील बाजूस एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, सुकेन महातो या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. शिरूर येथील न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाला बोलावून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे जतन करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके स्थापन केली असून तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. मयत सुकेन महातो हा मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने तो या भागात राहत होता. त्याची हत्या जुन्या वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलिसांकडून सखोलपणे केला जात आहे. आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदतही घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.