‘मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही’; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला
पुणे : भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) यांच्या विरोधात पुण्यात (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय धुलचंद कारंडे असं सावेंच्या ओसडींचं नाव आहे, त्यांच्यावर पत्नीचा (Pune Crime News) खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कारंडे यांनी आपल्या लहान मुलालाही बॅटने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी नवीन गार्डन या त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.(Pune Crime News) तर अतुल सावे यांच्या ओएसडीच्या पीडित पत्नी यांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली.
मंत्री अतुल सावे यांच्या ओएसडीच्या घरीच कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं समोर आलं आहे. मी मंत्र्याचा ओएसडी माझा कोणी काहीही बिघडवू शकत नाही म्हणत पत्नीला धमकी दिली. त्याचबरोबर पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या हातापायावर काळे निळे डाग पडले होते. मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांनी स्वतःच्याच पत्नीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर मुलाला देखील मारहाण केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या पत्नीने मोबाईलचा पासवर्ड मागितला याचा त्यांना राग आला आणि त्यानंतर त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तीन वर्षांपासून अतुल सावे यांच्याकडे ते ओएसडी म्हणून काम करतात अशी माहिती समोर आली आहे.
पत्नीला सोबत मुंबईत घेऊन गेले नाही. मुलांनाही पुण्यातच ठेवलेलं. त्यामुळे पत्नीला संशयाला आणि त्यांनी मोबाईलच्या पासवर्ड बाबत विचारणा केली होती. याचाच राग मनात धरून मारहाण केली आहे. सोबतच मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही असं म्हणत पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देखील दिली. हा सगळा त्रास झाल्यानंतर पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि विजय कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विजय कारंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या विजय कारंडे यांचा पोलीस शोध घेत आहे. पत्नीच्या वडिलांना देखील धमक्या देऊन त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची मागणी केल्याचे देखील पत्नीच्या वडिलांनी सांगितलं आहे.
Atul Save OSD: नेमकं काय घडलं?
क्वीन्स गार्डन निवासस्थानी पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅटबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. याचा राग कारंडे यांना आला आणि ते संतापले. त्यानंतर त्यांनी पत्नीला बॅटने मारहाण करायला सुरुवात केली. फक्त मारलंच नाही तर पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा ही आरोप आहे. आपल्या आईला वाचवण्यासाठी कारंडे यांचा मुलगा भांडणाच्या मध्ये गेला मात्र कारंडे यांनी त्याच्यावरही बॅटने मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि मुलगा दोघेही स्वतःचा जीव वाचून घराबाहेर पडले.(Pune Crime News)
त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि विजय कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारी वरून पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक दुखापत करणं, धमकी देणं यावरून गुन्हा दाखल केला आहे. करंडे हे नांदेड येथील समाज कल्याण विभागात कार्यरत असून सध्या मुंबईत मंत्रालयात ओबीसी कल्याण, ऊर्जामंत्री यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून प्रतिनियुतीवर काम करत आहे. मंत्र्याच्या ओसडीने केलेल्या या प्रकारामुळे घरगुती हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.(Pune Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.