खाकी वर्दीची भीती शून्य? पुण्यात चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, चार जणांकडून लाथा-ब
गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणेअदृषूकमुंबई महामार्गावरील (Pune Mumbai Highway) खडकी (Khadki) परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस (Police) शिपायांवर चार जणांच्या टोळीने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री घडली. चर्च चौक खडकी येथे ही घटना घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)
जखमी झालेल्या पोलिसांची नावे गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघे मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान, एका वाहनचालकाने अतिशय वेगात व वेडीवाकडी गाडी चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला थांबवून विचारणा केली. मात्र, या क्षुल्लक कारणावरून वाहनात असलेल्या चार जणांनी संतप्त होऊन पोलिसांवर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले व बेदम मारहाण केली. घटनेनंतर जखमी पोलिसांनी तातडीने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गोपाल देवसिंग कोतवाल यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चारही आरोपींना अटक
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. फक्त वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या हेतूने पोलिसांनी केलेल्या साध्या सूचनेवरून हा हल्ला करण्यात आल्याने, आरोपींच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपींवर सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींवर ड्युटीदरम्यान हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.