थरारक घटनेनं पुन्हा पुणे हादरलं! वाघोलीत मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; मारेकरी फरार


गुन्हे बातम्या ठेवा पुणे: शिक्षणाचं माहेरघर अन् सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नक्की चाललंय तरी काय? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शहरात कधी गाड्यांची तोडफोड होते, तर कधी हातात शस्त्र (Pune Crime News) घेऊन थेट सोसायटीमध्ये शिरणाऱ्या गुंडांची दहशत, तर कधी हत्येच्या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली आहे. अशातच आता पुणे पुन्हा हत्येच्या (Crime News)घटनेनं हादरलं आहे. पुण्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुन्हेगारीची बातमी ठेवा: मृत आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे. वाघोलीच्या प्यासा हॉटेलसमोर एका तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने वार करून हत्या केली आहे. या हल्ल्यात बादल शेख या तरुणाचा मृत्यू झाला असून मृत आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी फरार झाला असून वाघोली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हि हत्या नेमकं कोणत्या कारणातून झाली याचे अद्याप कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान आता फरार आरोपीला शोधून अटक करणं हे पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे.

वार्ड गुन्हेगारीच्या बातम्या: वर्ध्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी हत्या झाल्याने खळबळ

वर्ध्याच्या शेकापूर इथं मुलाने वडिलाची घरगुती वादातून हत्या केली तर पुलगाव इथं तीन युवकांनी एका युवकाला संपविल्याची घटना उघडकीस आलीय. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन्ही हत्याच्या घटनातील चार आरोपीना अटक करण्यात आलीय. शेकापूर इथल्या मृतकाचे नाव शालीक तिजारे तर पुलगाव इथल्या मृतकाचे नाव अक्षय माहोरे असे आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Explosion of Generator : विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा अचानक स्फोट, सात जण जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा स्पोट झाल्याने दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना असून दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान जनरेटर मधील डिझेल संपल्यामुळे कोणीतरी त्यात डिझेल टाकले मात्र जनरेटर गरम असल्यामुळे डिझेल टाकताना त्याचा स्फोट झाला. जनरेटर जवळ त्यावेळी उभ्या असलेल्या चार महिलांसह सात जण यात जखमी झाले.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.