पुण्यात बसची वाट पाहणाऱ्या तरुणीची छेडछाड, मुलीने धाडसाने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला अन् विकृत जॅक

गुन्हे बातम्या ठेवा: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवडमधून महिलांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील (Flyover) एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका 24 वर्षीय तरुणीची अश्लील हावभाव करत छेडछाड करण्यात आली. मात्र, पीडित तरुणीने दाखवलेले धाडस आणि पिंपरी पोलिसांचा तांत्रिक तपास यामुळे या विकृत आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जाकीर हमीद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास पीडित 24 वर्षीय तरुणी कंपनीच्या बसची वाट पाहत एम्पायर इस्टेट बीआरटी स्टँडवर उभी होती. सकाळी वर्दळीची वेळ असतानाही आरोपी जाकीर शेख तिथे आला आणि त्याने तरुणीला पाहून अश्लील चाळे व हावभाव करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने न घाबरता तरुणीने अत्यंत हुशारी आणि धाडस दाखवले.

Pune Crime News: विकृत जॅकेट-टोपी टाकून पळाला

तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पुरावा (Evidence) गोळा करण्यासाठी तात्काळ मोबाईल काढून आरोपीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video Recording) सुरू केले. तरुणी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असल्याचे पाहताच आरोपी जाकीर घाबरला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने अंगातील जॅकेट आणि डोक्यातील टोपी तिथेच रस्त्यावर फेकून दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

Pune Crime News: पोलिसांकडून 100 हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे (Pimpri Police Station) पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज (CCTV Footage) गोळा करून त्याची कसून तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. अखेर पिंपरी पोलिसांच्या पथकाने वाल्हेकरवाडी परिसरात सापळा रचून आरोपी जाकीर हमीद शेख याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Pune Crime News: पुण्यातील राजगड तालुक्यात फायरिंग; दोघे जखमी

राजगड तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून फायरिंगची घटना घडली. या घटनेत दशरथ शिळीमकर आणि मस्कु दसवडकर हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात 4 ते 5 आरोपी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

आणखी वाचा

Comments are closed.