पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची माथेफिरुकडून विटंबना, कोयता घेऊन….

बातम्या ठेवा: पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरुने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway station) परिसरात अनेक प्रवासी होते. त्यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन याठिकाणी आला. त्याने केशरी  रंगाचा कुर्ता धातला होता. सुरज शुक्ला हा महात्मा गांधींचा (Mahatama Gandhi) पुतळा असलेल्या चौथऱ्यावर चढला आणि त्याने पुतळ्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. हा प्रकार प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना पाचारण केले. रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरज शुक्ला (Suraj Shukla) याला चौथऱ्यावरुन खाली उतरवून ताब्यात घेतले. सुरज शुक्ला याने तोपर्यंत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या छातीवर आणि पायाने कोयत्याने वार केले होते. त्याला गांधींच्या पुतळ्याचे डोकं कोयत्याने तोडायचे होते. मात्र, त्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी सुरजला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. (Crime news in Pune)

प्राथमिक माहितीनुसार, सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे. तो नोकरीसाठी पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील (Satara News) वाईत वास्तव्याला होता. त्याने अलीकडेच शहाळं फोडण्यासाठी कोयता (Koyta) विकत घेतला होता. तो वाईतून पुण्यात आला आणि त्याने पुतळ्याची विटंबना केली. सुरज शुक्ला याच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल पूर्वीपासूनच द्वेष होता. हा द्वेष रविवारी रात्री उफाळून आला. यानंतर सुरज शुक्ला याने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर हल्ला चढवला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी आणि तपासाला सुरुवात केली आहे. सुरज शुक्ला हा कोणत्या संघटनेशी संबंधित होता का? त्याने हे कृत्य का केले, या सगळ्याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांकडून सुरज शुक्ला याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची अधिका चौकशी केली जाईल. आता त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=rm3zM8vzhus

आणखी वाचा

“भारत नाही, पाकिस्तानचे राष्ट्रपिता महात्मा गांधी…”; वादग्रस्त वक्तव्यावर गायक अभिजीत भट्टाचार्यांना लीगल नोटीस

महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान!

आणखी वाचा

Comments are closed.