लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न
गुन्हे बातम्या ठेवा: जुना पुणे–मुंबई महामार्गावर (Old पुणे-मुंबई महामार्ग)लोणावळ्याजवळ (Lonavala Crime) कार चालकांना टार्गेट करणारी एक धक्कादायक टोळी सक्रिय झाली असून, बनावट बँक लोनचा बहाणाकरून लूट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. एका जागरूक कार चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Pune Crime News : कारवर आयसीआयसीआय बँकेचे 10 लाख रुपयांचे कर्ज थकीत; कार ओढून नेण्याची धमकी
दरम्यानसंबंधित चालकाने काही दिवसांपूर्वीच Cars 24कडून जुनी ह्युंदाई व्हेरना कार खरेदी केली होती. लोणावळ्याजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. एका निर्जन ठिकाणी या व्यक्तींनी चालकाला जबरदस्तीने गाडी थांबवण्यास भाग पाडले. गाडी थांबवताच, या कारवर आयसीआयसीआय बँकेचे 10 लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे, असा दावा करत या तरुणांनी चालकावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसेच कार ओढून नेण्याची धमकी देऊन ते चालकाला बाहेर येण्यास सांगत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने गाडीचा दरवाजा उघडला नाही किंवा काचही पूर्ण खाली केली नाही. त्याने तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
Lonavala Crime : सर्व प्रकार कारच्या डॅश बोर्डवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अशातचपोलीस येत असल्याचे समजताच संशयित आरोपींनी तेथून पळ काढला. नंतर पडताळणी केली असता, गाडीवर कोणतेही कर्ज थकीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सर्व प्रकार कारच्या डॅश बोर्डवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र या प्रकरणी कार चालकाने कोणतीही फिर्याद लोणावळा पोलिसांत दिली नसल्याने, उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अशी कोणती घटना घडली आहे का याचा तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे करत आहेत.
Pune : खेड तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं एका कुत्र्यांचा जीव घेतला, घटना सीसीटीव्हीत कैद!
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा पुन्हा एकदा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय. काही दिवसांपूर्वीच चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे चित्र आता पुन्हा स्पष्ट झाले आहे.या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले आणि नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.