शरद मोहोळच्या हत्येचा सूड घेण्यासाठी प्लॅनिंग, पुणे पोलिसांना टीप मिळाली, एकाला अटक
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मागच्या वर्षी 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या घराजवळच गोळ्या घालून खून करण्यात आला होता. कोथरूड येथील सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्या घराजवळच त्याच्यावरती हल्ला झाला होता. या प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीकडून एक पिस्टल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एक पिस्टल देखील जप्त करण्यात आली आहे. ओंकार सचिन मोरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी आरोपी फरार होता. फरार असलेल्या ओंकार मोरे याला पोलिसांनी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी ओंकार सचिन मोरे हा शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी करत होता. मोरे सोबत या आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस आता तपास करत आहेत. या आरोपींच्या निशाण्यावर कोण होते? त्याच्या या कटात आणखी कोण सहभागी आहे? याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत.
शरद मोहोळचा घरासमोर गोळ्या झाडून खून
गँगस्टर शरद मोहोळचा (दि. 5 जानेवारी 2024) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळ सोबत सतत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ याच्यावर 3 जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यात 17 आरोपी निष्पन्न झाले. मुळशीतील विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह 17 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
बदला घेण्यासाठी प्लॅनिंग करणाऱ्या आरोपीला अटक
शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्लॅनिंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई कारवाई केली आहे. शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दाखल असलेल्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 1 पिस्टल देखील जप्त करण्यात आली आहे. ओंकार सचिन मोरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी आरोपी फरार होता. फरार असलेल्या ओेंकार मोरे याला रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.