पुण्यातील जंगलात शिकारीचा पर्दाफाश! अनेक शस्त्रांसह मोठं गभाड उघड; एका तरुणाला अटक
गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोना गावात “सिंग बंगल्यावर” वनविभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईत सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 52 किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे आणि शिकार सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शस्त्रास्त्रांबाबत मालकी अन् परवान्याची कसून चौकशी
या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 9 व 51 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळख पटविण्याकरिता पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी आणि परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. मात्र या घटनेने वन विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
चिंचवडमध्ये मेट्रो पिलरचा सांगाडा कोसळला
पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोसाठी उभारल्या जात असलेल्या पिलरचा लोखंडी सांगडा कोसळला आहे. पिंपरी ते निगडी दरम्याना मेट्रोची नवीन उन्नत मार्गिका उभारली जातीय, त्यासाठी पिलर टाकले जातायत, यापैकीच हा एक पिलर आहे. हजारो टन वजनाचा हा सांगाडा रात्री अचानकपणे कोसळला , या घटनेनं मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सुदैव इतकंच की ग्रेट सेपरेटर मध्ये हा सांगाडा कोसळला नाही, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती. आता महामेट्रो याबाबत कोणाला दोषी धरणार का? त्यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पिंपरी चिंचवडमधील ‘ते’ 29 बंगले जमीनदोस्त होणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत, 31 मे पूर्वी ही नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत . दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून दोन दिवसांची मुदत येथील रहिवाश्यांना देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.