‘बाहेर भेट, तुला संपवून टाकेन’, लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखां
गुन्हे बातम्या ठेवा: लग्नाच्या मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना झालेल्या किरकोळ बाचाबाचीवरून एका टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर कोयत्याचा धाक दाखवून 5 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना 27 एप्रिल रोजी रात्री 10 च्या सुमारास पुण्याच्या (Pune News) संगमवाडी परिसरात घडली.
Pune Crime News: नेमकी घटना काय?
फिर्यादी नंदू अर्जुन काची (व्यवसाय- पान शॉप) यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने संगमवाडी येथील सुनिता काची यांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फिर्यादी आणि त्यांचे मित्र गोपीनाथ चौर्य हे कार्यक्रमात साऊंड सिस्टिमवर डान्स करत असताना आरोपी संतोष काची तिथे कारमधून आला. थोडा वेळ डान्स केल्यानंतर संतोषने विनाकारण नंदू काची यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
Pune Crime News: जीवे मारण्याची धमकी आणि लूटमार
“तू मला बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करून तुला जीवे ठार मारीन,” अशी धमकी देत संतोषने नंदू यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने आपला मुलगा यश काची आणि इतर साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दहशत निर्माण करण्यासाठी संतोष काची याने कोयता हवेत फिरवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये मोठी घबराट पसरली. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील 5 तोळ्यांची (किंमत 5 लाख रुपये) सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला.
Pune Crime News: पाच आरोपींना अटक
याप्रकरणी नंदू काची यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. संतोष काची (वय 45, रा. सांगवी), यश काची (वय 20, रा. सांगवी), दत्ता रघुनाथ चव्हाण (वय 37, रा. वारजे), सुशिल सूर्यकांत सर्वगौड (वय 43, रा. पाटील इस्टेट), यश दीपक सावंत (वय 23, रा. जुनी सांगवी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. लक्ष्मीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, भरवस्तीत कोयता काढून दहशत माजवणाऱ्या या टोळक्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.