जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
गुन्हे बातम्या ठेवा: पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून पुण्यात गोळीबार (Pune Firing) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची (Crime News) घटना घडली आहे. या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना (Pune Crime News) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सध्या अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जुन्या वादातून साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मोजेश शेखापुरे या तरुणावर गोळीबार केला होता. या घटनेबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेट परिसरात लपून बसले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी परिसर चारही बाजूंनी घेरून छापा टाकला.
Pune Crime News: अचानक झडप घालून दोन्ही आरोपींना अटक, विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त
दरम्यान, पोलिसांनी अचानक झडप घालून दोन्ही आरोपींना कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडे विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीतून गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावेही निष्पन्न झाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Pune Crime : विनयभंग करणारा निघाला एमपीएससीचा विद्यार्थी; शिवाजीनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत ठोकल्या बेड्या
पुण्यात शिवाजीनगर भागात एका तरुणीचा विनयभंग करणारा हा एमपीएससी करणारा विद्यार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तू खूप सुंदर दिसते म्हणत पोर्टर डिलिव्हरी बॉयने शिवाजीनगर परिसरातील एका तरुणीचा विनयभंग केला होता. त्यानंतर तरुणीने डिलिव्हरी बॉय विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रात्रीच या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज गाडीचा नंबर आणि पोर्टर ॲप मध्ये दिलेले डिटेल्स हे सगळं तपासून 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीधर कांबळे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. श्रीधर हा मूळचा कराडचा राहणारा आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यात शुक्रवार पेठेत राहून एम पी एस सी चा अभ्यास करत होता आणि रिकाम्या वेळात पोर्टरच काम करायचा
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.