बाळा आज तुझा पहिला वाढदिवस, खूप चांगला करायचा होता, पण मी पोलीस खात्यात… भावनिक स्टेटस टाकत प


पुणे पोलीस गुन्हे बातम्या: अलीकडच्या काळात सातत्याने पुण्यातील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय असतो. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना येत असलेले अपयश या मुद्द्यावरुन अनेकदा टीका होते. मात्र, आता पुणे पोलीस (Pune Police) दलातील अंतर्गत वादातूनच एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल रणदिवे हे 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांच्या शोधासाठी पाच पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. निखिल रणदिवे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे (Nikhil Randive) यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे पुणे पोलीस दलातील अंतर्गत वाद आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांची मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांकडून मनामानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पिळवणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Pune News)

निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, नारायण देशमुख हे निखिल रणदिवे यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला. तसेच मुलीच्या आजारपणात आणि तिच्या पहिल्या वाढदिवसाला सुट्टी मागितली असता, ती नाकारण्यात आल्याने रणदिवे प्रचंड मानसिक तणावात होते. मानसिक छळ आणि गेल्या वर्षभरापासून हुकूमशाही पद्धतीने वागणूक मिळत असून, सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. निखिल रणदिवे यांच्या पोस्टमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हेदेखील नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Pune news: निखिल रणदिवे यांची सोशल मीडियावर शेवटची पोस्ट

निखिल रणदिवे यांच्या मुलीचा 5 डिसेंबरला वाढदिवस होता. त्यांनी मुलीच्या वाढदिवसासाठी रजेचा अर्ज केला होता. मात्र, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी रजा देण्यास नकार दिला. त्यानंतर निखिल रणदिवे यांनी व्हॉटसअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. यामध्ये त्यांच्या मुलीचा फोटो होता. त्यासोबत निखिल रणदिवे यांनी काही मजकूर लिहला होता. “बाळा आज तुझा पहिला वाढदिवस, खूप चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस खात्यात नोकरीला आहे, जिथे वरिष्ठांची मनमानी चालते… दीदी तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे निखिल रणदिवे यांनी या स्टेटसमध्ये म्हटले होते. या मेसेजनंतर काही वेळातच त्यांनी स्वतःचा फोटो ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या फ्रेममध्ये पोस्ट केला आणि आपला मोबाईल स्विच ऑफ केला. तेव्हापासून त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.

रणदिवे यांचे स्टेटस पाहताच त्यांच्या सहकारी आणि नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यांचे भाऊ अक्षय रणदिवे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अद्याप यवत पोलीस ठाणे किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रा केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा, अशी मागणी निखिल रणदिवे यांच्या पत्नीने केली आहे.

Pune police Suicide news: निखिल रणदिवेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेली सुसाईड नोट

निखिल रणदिवे यांनी 4 डिसेंबरला वरिष्ठ अधिकारी बापूराव दडस यांना एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्यांनी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या वर्षभरापासून आपल्याला त्रास आणि मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून म आत्महत्या करत असल्याचेही या मेसेजमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

भिंतीवर बिब्बा, नागाच्या आकाराचा खिळा; नेहाच्या घरात नको नको ते मिळालं, 7 पानी सुसाईड नोट लिहून संपवलं होतं जीवन

आणखी वाचा

Comments are closed.