परभणीचे पुण्यात राहणारी पोरं, पानशेतला फिरायला गेले अन् कांड झालं; सिगारेटचा धूर अन् हत्या…;
पुणे: पुणे शहरातील पाच जण मित्र पानशेत परिसरात फिरण्यासाठी गेले असताना त्यांनी केलेल्या कृत्याने (Pune Crime News) त्यांना आता तुरूंगात जावं लागलं आहे. फिरायला गेलेल्या या पाच मित्रांनी अगदी किरकोळ कारणावरून तेथील एका स्थानिक युवकाचा खून केला आहे. हा संपूर्ण प्रकार वेल्हा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पानशेत परिसरात परिसरामध्ये घडला आहे. खून (Pune Crime News) केल्यानंतर हे पाचही जण पसार झाले होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्टेशनच्या पथकाने या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोहिदास काळूराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. वेल्हा, पुणे) असे आहे.(Pune Crime News)
अटक झालेल्या आरोपींची नावे आकाश सुभाष भिसे (वय 21), भागवत मुंजाजी आसुरी (वय 20), रितेश उत्तम जोगदंड (वय 19) रमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19) हे पाचही तरुण परभणी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून, सध्या पुण्यातील नऱ्हे परिसरात राहतात. आरोपींनी सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली आणि एकाने तर त्याच्या छातीवर दगड मारला. यामध्ये रोहिदास काटकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला सुरुवात केली आणि यातील सर्व आरोपींना अटक केली
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी हे पाचही मित्र पानशेत परिसरात फिरायला गेले होते. यातील काही तरुणांनी नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर सिगारेट ओढायला सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक रहिवासी रोहिदास काटकर यांनी त्यांना विरोध केला. त्यावरून बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात पाचही आरोपींनी त्याला मारहाण केली. यातील एका आरोपीने रोहिदासच्या छातीत दगड मारल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर पाचही आरोपी पसार झाले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे पानशेत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पर्यटनस्थळांवरील शिस्त आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.