बंडू आंदेकर जमिनीवर मांडी घालून बसला, पोलिसांनी गुडघ्यावर बसायला सांगताच चपला घेऊन….
गुन्हे बंडू अंदेकर घाला: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. यामध्ये कोमकर आणि गायकवाड टोळीचा सहभाग होता. या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने 19 वर्षांच्या आयुष कोमकर (Ayush Komkar) याला 5 सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरातील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून ठार मारले होते. आयुष कोमकरचे आजोबा बंडू आंदेकर (Bandu Andekar) यांच्या सांगण्यावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता. पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना सोमवारी रात्री बुलढाणानजीक समृद्धी महामार्गावर पळून जाताना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तर दोन मारेकऱ्यांना अगोदरच अटक करण्यात आली होती यानंतर पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हत्याप्रकरणाचा तपशील सांगितला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासोबत आठ आरोपींना चेहरे झाकून आणले होते.
या आठ आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचाही समावेश होता. गेली अनेक वर्षे पुण्यात आंदेकर टोळीचा दबदबा आणि दहशत आहे. बंडू आंदेकर हा नामचीन गुंड आहे. एका खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतरही बंडू आंदेकरने गुन्हेगारी क्षेत्र सोडले नव्हते. पुण्यात बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीचा प्रचंड दबदबा आहे. मात्र, मंगळवारी पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरबाबत केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणातील सर्व आठ आरोपींना प्रसारमाध्यमांसमोर आणले. त्यांचे फोटो काढण्यासाठी या सर्वांना खाली बसवण्यात आले होते. तेव्हा बंडू आंदेकर सगळ्यांच्या मधोमध मांडी घालून बसला होता. तर इतर आरोपी हे गुडघ्यावर बसले होते. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बंडू आंदेकर याला गुडघ्यावर बसण्याच्या सूचना दिल्या. यानंतर बंडू आंदेकर उठला आणि निमूटपणे आपल्या काळ्या रंगाच्या चपला हातात घेऊन गुडघ्यावर बसला. बंडू आंदेकर हा जवळपास 60 वर्षांचा आहे. साहजिकच वयपरत्वे त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे त्याला गुडघ्यावर बसण्यात अडचण होती. मात्र, पोलिसांनी आपल्या 19 वर्षांच्या नातवाचा बळी घेणाऱ्या याच बंडू आंदेकरला मुकाट्याने गुडघ्यावर बसण्यास भाग पाडले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Bandu Andekar: बंडू आंदेकरने नातवाच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप फेटाळला
बंडू आंदेकरला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची लगेच चौकशी सुरु केली. यावेळी बंडू आंदेकर याने आयुष कोमकर याच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा आरोप फेटाळला. त्याने म्हटले की, आयुष कोमकर हा माझा नातू होता. त्याचा खून करून मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? कौटुंबिक वादातून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. माझ्या मुलाची गेल्यावर्षी हत्या झाली. त्या प्रकरणात आपण फिर्यादी आहोत. त्याचा बदला म्हणून माझे नाव याप्रकरणात गोवण्यात आले. आयुषची हत्या झाली त्यादिवशी मी केरळमध्ये होतो, असा दावा बंडू आंदेकरने पोलीस चौकशीत केला होता. आयुषची आई कल्याणी कोमकर हिने बंडू आंदेकर आणि इतरांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याविषयी बोलताना बंडू आंदेकर म्हणाला की, माझ्या मुलाच्या हत्याप्रकरणात मी फिर्यादीच्या पतीचे, सासऱ्याचे आणि दीराचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता त्यांनी मला याप्रकरणात गोवले. माझं संपूर्ण कुटुंब जेल मध्ये गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी कल्याणीच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं आहे, असे बंडू आंदेकर पोलिसांना म्हणाला.
https://www.youtube.com/watch?v=पीकेयू -3 सीजेजे 6 एक्सयू
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.