चारित्र्यावर संशय, नात्याला ‘कात्री’; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नी संपवलं
पुणे : कधी कोयता गँगची दहशत, कधी ड्रग्जचं जाळं तर कधी नात्याची हत्या.. पुण्यात घडणाऱ्या या घटना पाहून एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे पुण्याची ओळख क्राईम सिटी अशी होतेय का? ही ओळख पुसली जावी म्हणून पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पण गुन्हे काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीत. पुण्यात पतीने पत्नीची हत्या केलीये. पण त्याने असं का केलं? नेमका काय वाद झाला होता? ते पाहुयात,
आधी वाद झाला, मग कात्रीने पत्नीची हत्या केली आणि नंतर याच घटनेचा व्हिडीओ केला. कुठल्यातरी क्राईम वेब सीरिजची स्टोरी आहे असं कुणालाही वाटेल. पण ही घटना काल्पनिक नसून क्रृरतेची सीमा गाठणारं हे वास्तव आहे.
नराधमाने व्हिडीओ चित्रित केला
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ज्योती गिते आणि तिची हत्या करुन व्हिडीओ काढणारा तिचा पती शिवदास गीते. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केली. कात्रीने वार करत शिवदास गीते त्याच्या पत्नीवरचा राग बाहेर काढत होता. तर जगण्यासाठी ज्योती गीते धडपडत होती. हे सगळं घडत होतं ते पाच वर्षांच्या लेकरासमोर. ज्योती माझ्या घरची लक्ष्मी होती असं म्हणत नराधम पतीने व्हिडीओही चित्रीत केला.
अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्याच्या खराडीत घडली. पण हे कुटुंब मूळचं बीडचं आहे. आरोपी शिवदास गीते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात स्टेनो म्हणून कार्यरत होता. तर संसाराला हातभार म्हणून पत्नी ज्योती शिवणकाम आणि घर काम करत होती. एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते. परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदास याला सांगत होती. यावरुन दोघांमध्ये वारंवार वाद होत असे.
चारित्र्यावरच्या संशयाने एका क्षणात आठ वर्षांच्या संसाराची राखरांगोळी केली. कुठे कात्रीने नात्याचा गळा चिरला तर कुठे बायकोचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले. तेलंगणात निवृत्त जवानाने पत्नीचा खून करुन प्रेशर कुकरमध्ये उकडून ते तलावात फेकले.
हे सगळं ऐकलं तरी अंगावर काटा येतो. माणूस एवढा अमानवी कसा काय वागू शकतो? दिवसेंदिवस नात्यातला दुरावा का वाढतोय? रागाचा, संशयाचा हा असाच शेवट का होतो? याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.