एबी फॉर्म गिळणारा शिंदे सेनेचा उमेदवार अखेर पोलीस स्टेशनमध्ये प्रकट झाला, म्हणाला,’ प्रभाग क्र

पुणे: राज्यात महानगरपालिका (Pune Election 2026) निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडी वेग आला, पक्षांनी अनेकांचं तिकीट कापलं, नव्या लोकांना संधी मिळाली, नाराजीनाट्य, पक्षांवरती तीव्र संताप दिसून आले, मात्र पुण्यात एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये लागलेल्या चढाओढीतून  एकानं एबी फॉर्म चक्क गिळण्याचा प्रकार समोर आला आहे. एबी फॉर्म गिळणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उद्धव कांबळे याच्यावर निवडणूक (Election) अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिस त्या उमेदवाराचा शोध घेत होते, फॉर्म गिळलेल्या उद्धव कांबळे हा उमेदवार स्वतःहून पोलीस स्टेशनला आला आहे. काल गुन्हा दाखल झाल्यापासून पासून ७० पोलीस त्याचा शोध घेत होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आपण स्वतःहून पोलीसांसमोर हजर झाल्याचं त्याच म्हणणं आहे. पक्षाने आपल्यालाच प्रभाग क्रमांक ३६ मधून उमेदवारी दिली असून आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत असा त्याचा दावा आहे.(Pune Election 2026)

Pune Election 2026: नेमकं काय घडलं?

पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. ढवळे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह मंगळवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर पक्षाकडून त्याच जागी उद्धव कांबळे या उमेदवाराला देखील एबी फॉर्म देण्यात आला आणि त्याने देखील मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र मच्छिंद्र ढवळे यांचा फॉर्म आपल्या आधी भरला गेलाय आणि त्यामुळे तो वैध ठरु शकतो हे उद्धव कांबळेच्या लक्षात आलं. त्यामूळे बुधवारी उमेदवारी अर्जाची छाणणी होत असताना उद्धव कांबळे कात्रजच्या क्षेत्रिय कार्यालयात पोहोचला आणि त्याने त्याच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले.

नियमानुसार तो त्याचा अधिकार असल्याने कर्मचाऱ्यांनी अर्जांचा गठ्ठा त्याला पाहण्यासाठी दिला. मात्र त्याने मच्छिंद्र कांबळेच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेला पक्षाचा ए बी फॉर्म फाडला आणि तो बाथरुमच्या दिशेने पळाला. निवडणूक कर्मचारी त्याच्या मागे पळाले, मात्र उद्धव कांबळेने तो अर्ज पटकन स्वतःच्या तोंडांत कोंबला आणि गिळून टाकला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलीसांकडे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

Pune Election 2026: फॉर्म गिळणाऱ्या कांबळे यांच्यावर गुन्हा

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेल्हा येथील नायब तहसीलदार मनीषा भुतकर यांनी, सरकारी कामात हस्तक्षेप आणि सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत कायदा व सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी उद्धव कांबळे याला ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.