अजित पवार-रुपाली चाकणकर घेणार इच्छुकांच्या मुलाखती, वन टू वन प्रश्न विचारणार, 41 प्रभागांमधील उ
पुणे: महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारांच्या मुलाखती, युती, जागावाटप, बैठका यांना जोर आला आहे. अशातच पुण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष पुण्यात स्वबळावर लढणार असल्याचं चित्र आहे, या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच अजित पवार यांच्या उपस्थितीत आज इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. पुणे महानगरपालिकेच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार मुलाखती घेत आहेत. (Mahanagrpalika Election)
पुण्यातील सर्व ४१ प्रभागांमधील उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहिले आहेत. अजित पवार स्वतः सर्व इच्छुक उमेदवारांच्या वन टू वन मुलाखती घेत आहेत. पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे मुलाखतीला सुरुवात झाली आहे. अजित पवारांसह रूपाली चाकणकर आणि दोन्ही शहराध्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित आहेत. (Mahanagrpalika Election)
Pune Election: पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी, अशी तिरंगी लढत
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपची राष्ट्रवादीशी युती होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी, अशी तिरंगी लढत होणार आहे. त्या तिरंगी लढतीतही ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी’ अशीच लढत होईल, असं चित्र दिसून येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड सह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 2017 ला झाल्या होत्या. फेबुवारी 2022 मध्ये हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होणे अपेक्षित होते. इतर मागासवर्गाचे आरक्षण आणि प्रभागरचना यावरून न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे तब्बल तीन वर्षे महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर न्यायालयाने मे महिन्यात या सर्व याचिकांवर निकाल देताना 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रभागरचनेपासून आरक्षण सोडतीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये 120 नगरसेवक निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या भाजपला पुण्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुका जाहीर होताच, व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सामना होणार हे चित्र स्पष्ट झाले. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्याही पुण्यातील बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यातील तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
Pune Election: एकनाथ शिंदेकडे धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार
165 जागांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे. मात्र शिवसेनेकडून भाजपकडे 35-40 जागांसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. युतीत बाजूला ठेवलं की नाही माहित नाही पण पक्षाचं नीट व्हावं अशी इच्छा धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. मी पक्षावर किंवा पक्ष माझ्यावर नाराज नाही, स्थानिक नेते आणि आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीला मी हजर राहणार आहे. त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना 165 जागांसाठी अहवाल पाठवणार आहे, भाजपकडून पुण्यात 125 जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे त्यामुळे 35 ते 40 जागा शिवसेनेला मिळण्याची चर्चा आहे मात्र रवींद्र धंगेकर 165 जागांवर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.