अखेर अमित शाह अन् मुरलीधर मोहोळ यांची भेट; रात्री 1.20 वाजता मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?
Muralidhar Mohol Meet Amit Shah: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसून आले. मात्र रविंद्र धंगेकरांचे सर्व आरोप मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावले होते.
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बाबत काल विशाल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टींना आपण व्यवहार रद्द करत आहोत माझे पैसे परत द्या, असा मेल केला आहे. एका बाजूला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रविंद्र धंगेकर यांना दोन दिवस काही न बोलण्याचे आदेश दिले असल्याचे स्वतः रविंद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. तसेच चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते, असा दावाही रविंद्र धंगेकरांनी केला. याचदरम्यान, मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol Meet Amit Shah) यांची मुंबईत भेट झाली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अमित शाह यांचे स्वागत केले.
Amit Shah Yanche Mumbai Timeless Amit (मुरलीधर मोहोळ अमित शहा यांना भेटा)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत काल रात्री आगमन झालं. केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांचे रात्री 1.30 वाजताच्या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. केंद्रीय मंत्री शहा यांचे स्वागत सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई | रात्री १ः२० वा.
आमचे नेते, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांचे नियोजित मुंबई दौऱ्यासाठी आगमन झाले असता मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत केले.#अमितशाह #मुंबई… pic.twitter.com/EF7vnULpKX
— मुरलीधर मोहोळ (@mohol_murlidhar) 26 ऑक्टोबर 2025
अमित शाहांच्या हस्ते अत्याधुनिक नौकांचे वितरण- (अमित शहा मुंबईत)
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज, मुंबईतील माझगाव डॉक येथे, ‘खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचे वितरण होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लाभार्थींना खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांच्या चाव्या सुपूर्द करणे, हा सहकार प्रणित, खोल समुद्रातील मासेमारी क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. हे पाऊल आत्मनिर्भरता, शाश्वतता आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सहकारी संस्थांना बळकट करण्याप्रति भारताच्या बांधिलकीचे प्रतीक असणार आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.