पुण्यातील किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टी, मनसेची अचानक धाड, नामांकित कॉलेजमधील 17-21 वयोगटातील मु

पुणे: पुण्यातील राजाबहादूर मिल्स येथील “किकी” नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती, कुठलेही ओळखपत्र न पाहता तसेच एन्ट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील १७-२१ वयोगटातील मुलांना ह्या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट ही पार्टी बंद पाडली.

मनविसे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट्स ने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल हा थेट इशारा यावेळी देण्यात आला.मनाविसे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट्स ने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पब ची एक ही काच शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाबहादूर मिल्स येथील “किकी” (Kiki) नावाच्या पबमध्ये आयोजित करण्यात आलेली नामांकित कॉलेजमधील तरुण-तरुणींची ‘फ्रेशर्स पार्टी’ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) थेट बंद पाडली. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती. पब चालकांनी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र न पाहता तसेच एंट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता १७ ते २१ वयोगटातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, असा गंभीर आरोप मनविसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मनविसे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी पबमधील हा गैरप्रकार उघडकीस आणत ही पार्टी तातडीने बंद पाडली.

यावेळी मनविसेकडून पब चालकांना थेट इशारा देण्यात आला आहे. “इथून पुढे जर कुठल्याही पब किंवा रेस्टॉरंट्सने ‘फ्रेशर्स पार्टी’ आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली, तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरातील पब्समध्ये होत असलेल्या अवैध मद्य विक्रीच्या प्रकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.