पुण्यात भाजपनेही अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवलं, गुन्हेगारांना मानाचं पान दिलं, कात्रजमधून कु
पुणे : पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबात अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. अशातच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला AB फॉर्म देण्यात आले आहे. त्यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर हल्लाबोल झाला, मात्र आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे, भाजपने कात्रजमध्ये आंबेगाव भागातील प्रभाग क्रमांक ३८ मधून उमेदवारी दिलीय ती देविदास चोरघेची पत्नी प्रतिभा चोरघेला. रोहिदास चोरघेंवर हत्येचे अनेक गुन्हे नोंद असून अपहरण, खंडणी, गोळीबार अशा गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. (Pune Mahangarpalika Election 2026)
रोहिदास चोरघे हा वेल्हे तालुक्यातील वांगणी गावचा असून त्याची वेल्हे तालुक्यात आणि पुणे शहरच्या दक्षिण भागात दहशत राहिली आहे. ७ फेब्रुवारी २००८ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आणि इस्टेट एजंन्ट असलेल्या संदीप बांदलची हत्या केल्याचा गुन्हा रोहिदास चोरघेंवर नोंद करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून येरवडा कारागृहात डांबलं. ५ फेब्रुवारी २००११ ला आजारी असल्याचा त्यानं बहाणा केला. त्यामुळं त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं. उपचारानंतर पाणी प्यायचं आहे असं म्हणून तो सोबत असलेल्या कॉन्स्टेबलला घेऊन पाण्याच्या टाकीजवळ गेला. त्याने आधी स्वतः पाणी प्यायलं आणि तो कॉन्स्टेबल पाणी पित असताना त्याला धक्का देऊन तो पळून गेला.(Pune Mahangarpalika Election 2026)
त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. फरारी असलेल्या रोहिदास चोरघणे संदीप बांदल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या अविनाश शिळीमकरला न्यायालयाच्या आवारात मारण्याचा कट रचला. साक्षीदार अविनाश शिळीमकर साक्ष देण्यासाठी फेब्रुवारी २०१२ ला पुणे सत्र न्यायालयात आला असता न्यायालयाच्या आवारातच चोरघे आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केला ज्यामध्ये अविनाश शिळीमकरचा मित्र विजय कारके जखमी झाला. त्यानंतर रोहिदास चोरघे फरार होता. फरार असतानाच त्याने पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या आणेवाडी टोल नाक्यावर बंदुकीतून गोळीबार करून दहशत निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी रोहिदास चोरघेला वांगणी या त्याच्या गावातून अटक केली.
अटक करण्यात आली त्यावेळी तो वांगणी गावचा सरपंच होता. अटकेनंतर त्याला राजीमाना द्यावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रोहिदास चोरघे त्याच्या नऊ उमेदवारांच्या पॅनलसह पुन्हा बिनविरोध निवडून आला. त्यानंतर त्यान त्याच बस्तान पुण्यातील कात्रज-आंबेगाव परिसरात बसवलं. आता बायकोच्या माध्यमातून तो राजकारणात एंट्री करतो आहे. संदीप बांदल हत्या प्रकरणात त्याची पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटका झालेली असली तरी गोळीबाराचे खटले अद्याप न्यायप्रविष्ठ आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.