पुण्यात डीजेविरोधात मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सण-उत्सव साजरे करण्यास आमचा विरोध नाही; मात्र डीजे आणि स्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असा संताप वक्त करत पुणेकर आज रस्त्यावर उतरले.

डीजेविरोधात बाजीराव रोड ते शनिवारवाडा असा मोर्चा काढण्यात आला. या वेळी डीजेमुळे होणाऱया ध्वनिप्रदूषणाविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

‘साठ-सत्तर वर्षांपूर्वी डीजे नव्हता, तरी उत्सव तेवढय़ाच उत्साहात साजरे होत होते. डीजे नसेल तर उत्सव होत नाही, ही संकल्पना कुठून आली? कमी आवाजातही उत्सव साजरा करता येतो,’ असा सवाल मोर्चेकऱयांनी उपस्थित केला. समाजात राहताना स्वतŠसोबत इतरांचाही विचार करणे गरजेचे आहे. राजकीय लोक गणेश मंडळांकडे मतपेढी म्हणून पाहतात; मग सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासाचा विचार का केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

पुणेकरांचा डीजेला प्रखर विरोध; महापौरांनाही सुनावले खडे बोल

ढोल-ताशा, लेझीम यांसारख्या पारंपरिक वाद्यांनाही विरोध नाही. मात्र, डीजे ही आपली परंपरा नसून केवळ मोठा आवाज म्हणजे उत्सव नव्हे, असे स्पष्ट करीत ‘डीजे लावला म्हणजे हिंदू सण साजरा होत नाही; हिंदुत्व म्हणजे धांगडधिंगा नव्हे, असे पुणेकरांनी सुनावले. गणेशोत्सव डीजेमुक्त करावा, या मागणीसाठी पुण्यातील सर्वसामान्य नागरिक रविवारी मोठय़ा प्रमाणात गुडलक चौकात एकत्र आले. विशेष म्हणजे डीजेला समर्थन देणाऱया भाजपातील अनेक नागरिकांनी येथे उपस्थित राहून डिजेला विरोध दर्शविला. डीजे, डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात फलक आणि घोषणांद्वारे त्यांनी आपला विरोध नोंदविला. सर्वच धार्मिक उत्सवांमध्ये कर्णकर्कश डीजेला विरोध असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.

Comments are closed.