पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पोलिसांची हफ्तेखोरी? चोपल्यानंतर ट्रॅफिक वॉर्डनची कबुली,व्हिडीओ व्हायर

गुन्हे ठेवा: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहन चालकांना लुबाडणाऱ्या अर्थात हफ्तेखोरी करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला बेदम चोप देण्यात आलाय. वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे वसूल केल्याचं, ट्रॅफिक वॉर्डनने दिल्याचं व्हायरल व्हिडीओ दिसून येतंय. मारहाणीचा आणि कबुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

संतप्त नागरिकांनी उर्से टोल नाक्यावर रंगेहाथ पकडून त्या वॉर्डनला चांगलाच धडा शिकवला आहे. पाचशे रुपये कोणाच्या आदेशाने वसूल केले? असा प्रश्न संतप्त नागरिकांना विचारला असता, सुरुवातीला केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली.

नेमकं प्रकरण काय?

पुणेअदृषूकमुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर हफ्तेखोरी करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे वसूल करत असल्याचा त्याच्यावर आरोप असून, मारहाणीचा आणि कबुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली. तेंव्हा कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच नाव घेतल्यानं, संतप्त नागरिकांनी त्यांचा मोर्चा त्या वाहतूक पोलिसाकडे वळवला. हा व्हिडीओ पिंपरी चिंचवड पोलिसांकडे ही पोहचला, त्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. तर संबंधित वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटलांनी दिली. या घटनेने पोलीस खात्याची प्रतिमा आणखी मलीन झाली.

रंगेहाथ पकडला वॉर्डन

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनचालकाकडून पाचशे रुपये वसूल करत असताना हा वॉर्डन नागरिकांच्या हाती लागला. नागरिकांनी त्याला थांबवून, “कोणाच्या आदेशाने पैसे घेतोस?” असा प्रश्न विचारला. सुरुवातीला वॉर्डनने फक्त “साहेबांच्या आदेशाने” असे उत्तर दिले, परंतु उपस्थितांचा रोष पाहून त्याने कबुली दिली की, तो एका वाहतूक पोलिसाच्या सांगण्यावरूनच पैसे घेत होता.

वॉर्डनकडून पोलिसाचे नाव ऐकल्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट त्या संबंधित वाहतूक पोलिसाकडे मोर्चा वळवला. या सर्व घटनेचे व्हिडिओ नागरिकांनी चित्रीत केले असून, सोशल मीडियावर त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. यात वॉर्डन कबुली देतानाचे आणि नागरिकांनी त्याला चोप देतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसते.

पोलिस विभागाची बदनामी

या प्रकरणाने पोलिस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे. वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली चालकांकडून अवैधरित्या वसुली होत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. अनेक वाहनचालकांनी पूर्वीही अशा तक्रारी केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष रंगेहाथ पकडल्याचा हा प्रकार नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिस उपायुक्तांचा आदेश

हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे पोहोचताच, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीत संबंधित वाहतूक पोलिसाचा दोष सिद्ध झाल्यानंतर त्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर हफ्तेखोरी करणाऱ्या वॉर्डनला तातडीने नोकरीवरून काढण्याचे आदेशही दिले असल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.

आणखी वाचा

Comments are closed.