पुणे महानगरपलिकेची प्रारूप प्रभागरचना अखेर जाहीर; 41 प्रभाग अन् 165 नगरसेवक, जाणून घ्या A टू Z

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना काल (शुक्रवारी, ता २२) जाहीर झाली आहे, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ करण्यात आली आहे. सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहोचली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्येनुसार प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसुचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे, या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची रचना असेल, चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे ४१ प्रभाग निश्चित केले आहेत, असे पालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मनपा आयुक्तांनी प्रभाग रचना जाहीर करताना “पुणे महानगरपालिका निवडणूक 2025” असा उल्लेख केला.

४ नगरसेवकांचे ४० प्रभाग (मतदार संख्या ८४००० मतदार.)
५ नगरसेवकांचे १ प्रभाग (मतदारसंख्या १०५०००) अशी रचना असेल.

४१ प्रभाग कोणते?

प्रभाग ०१ – कळस – धानोरी
प्रभाग ०२ – फुलेनगर – नागपूर चाळ
प्रभाग ०३ – विमाननगर – लोहगाव
प्रभाग ०४ – खराडी – वाघोली
प्रभाग ०५ – कल्याणी नगर – वडगावशेरी
प्रभाग ०६ – येरवडा – गांधीनगर
प्रभाग ०७ – गोखलेनगर – वाकडेवाडी
प्रभाग ०८ – औंध – बोपोडी
प्रभाग ०९ – सुस – बाणेर – पाषाण
प्रभाग १० – बावधन – भुसारी कॉलनी
प्रभाग ११ – रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर
प्रभाग १२ – छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी
प्रभाग १३ – पुणे स्टेशन – जय जवान नगर
प्रभाग १४ – कोरेगाव पार्क – मुंढवा
प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी
प्रभाग १६ – हडपसर – सातववाडी
प्रभाग १७ – रामटेकडी – माळवाडी
प्रभाग १८ – वानवडी – साळुंखेविहार
प्रभाग १९ – कोंढवा खुर्द – कौसरबाग
प्रभाग २० – बिबवेवाडी – महेश सोसायटी
प्रभाग २१ – मुकुंदनगर – सॅलसबरी पार्क
विभाग 22 – काशेवडी – मरणे प्लॉट
प्रभाग २३ – रविवार पेठ – नाना पेठ
प्रभाग २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ
प्रभाग २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
प्रभाग २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ
प्रभाग २७ – नवी पेठ – पर्वती
प्रभाग २८ – जनता वसाहत – हिंगणे खुर्द
प्रभाग २९ – डेक्कनजिमखाना – हॅप्पी कॉलनी
प्रभाग ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
प्रभाग ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड
प्रभाग ३२ – वारजे – पॉप्युलर नगर
प्रभाग ३३ – शिवणे – खडकवासला
प्रभाग ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक
विभाग 35 – सनसिटी – मॅनिक बाग
प्रभाग ३६ – सहकारनगर – पद्मावती
प्रभाग ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी
प्रभाग ३८ – आंबेगाव – कात्रज
प्रभाग ३९ – अप्पर सुपर इंदिरानगर
प्रभाग ४० – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
प्रभाग ४१ – महंमदवाडी – उंड्री

आणखी वाचा

Comments are closed.