नवले ब्रिजच्या मृत्यूच्या सापळ्यात मराठी अभिनेत्याचा जीव गेला; अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु आयुष


पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी (ता १३) रोजी झालेल्या भीषण अपघातात (Pune Navale Bridge Accident) एका कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामध्ये कारचालक असलेला ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे. दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील (Pune Navale Bridge Accident) पाच जणांना बाहेर पडता आलं नाही, आणि अचानक आग लागल्याने आगीत सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी कार चालवत असलेल्या धनंजय कोळी यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चिमुकल्या लेकरांचं आगमन झालं होतं. अपघात (Pune Navale Bridge Accident) झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात होते. धनंजय सहा महिन्यांपासून वाहतुकीचा व्यवसाय करत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता. धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा आहे. (Pune Navale Bridge Accident)

Pune Navale Bridge Accident : तीन महिन्यांचा मुलावरचं वडिलांचं छत्र हरपलं

धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे राहत होता. त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. इन्स्टाग्राम प्रोफाईलवरती त्याने स्वतःचा अभिनेता असा उल्लेख केला आहे. ‘या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला. आणि त्यांच्या तीन महिन्यांचा मुलावरचं वडिलांचं छत्र हरपलं, तो वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला,’ अशी भावना त्यांचे नातेवाइक व्यक्त करत आहेत. नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात तीन महिन्यांच्या मुलाने पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धनंजय कोळी पुण्यात राहून आपली नाटकांची आवडही जोपासत होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच धनंजयच्या पत्नीने त्याच्यासह शेअर केलेली डोहाळ जेवणाची पोस्ट या हसऱ्या कुटुंबाची शेवटची ठरली.


Pune Navle Bridge Accident : मोक्षिता मावशीसोबत जाण्याचा हट्ट करून गेली अन्…

पुण्यातील या अपघातात कारमध्ये जे कुटंब होरपळलं त्यामधील स्वाती संतोष नवलकर यांच्या वडीलांना आधीच पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे स्वाती यांनी नसरापूरच्या दत्ताच्या पाच गुरुवारांचा नवस केला होता. कालचा गुरुवार हा नवसाचा पाचवा आणि अंतिम गुरुवार होता. नसरापूरला दर्शन घेऊन मुलगी, आई आणि वडील हे तिघे परत येत होते.त्याचबरोबर त्यांच्यासोबत मोशीतील पॅराडाईज वन सोसायटीतील रहिवासी हेमकुमार रेड्डी यांची तीन वर्षांची चिमुकली मुलगी मोक्षिता रेडी देखील होती, हिचा देखील गुरुवारी (दि. १३) पुण्यात नवले पुलावरील कंटेनर अपघातात मृत्यू झाला. रेड्डी आणि नवलकर कुटुंबाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने रेड्डी कुटुंब नवलकर यांच्या घरी धायरीला गेले होते. गुरुवारी स्वाती नवलकर यांनी देवदर्शनाला जाण्याचे नियोजन केले असताना मोक्षिता मावशीसोबत जाण्याचा हट्ट करून स्वाती यांच्यासोबत गेली होती. देवदर्शनावरून येताना हा अपघात झाला.(Pune Navle Bridge Container And Car Accident)

आणखी वाचा

Comments are closed.